TRENDING:

BMC Election: पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?

Last Updated:

BMC Eleciton: राज्यभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत.

advertisement
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र, मतदारयादीत घोळ असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, दुसरीकडे काहींची नावे वगळल्याचे प्रकारही समोर आले आहेत. बोगस मतदान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे दादरमध्ये दुबार मतदार आढळल्याने खळबळ उडाली.
पहिल्या तासात  ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला,  मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
advertisement

राज्यभर सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत. दुबार मतदार आढळल्यास त्याला तिथेच रोखण्याचे कडक आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले असतानाच, मुंबईत पहिल्यांदाच दुबार मतदाराचा प्रकार उघडकीस आला आहे. दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मतदानाच्या वेळी हा प्रकार समोर आला. या ठिकाणी मनसेचे यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

advertisement

नेमकं काय घडलं?

वॉर्ड क्रमांक १९२ मधून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. याच वेळी मतदान केंद्रावर एका महिला मतदाराचे नाव दुबार मतदार यादीत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित महिला मतदाराला तत्काळ थांबवण्यात आले.

त्यानंतर आधार कार्डच्या आधारे तिची ओळख पटवून निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तिच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. त्यानंतरच तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकाराला निवडणूक आयोगाच्या त्रुटी जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
थंडीच्या दिवसांत बनवा कुरकुरीत केळीची भजी, चवीला अतिशय टेस्टी, रेसिपीचा Video
सर्व पहा

दरम्यान, वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यात थेट लढत होत आहे. या प्रभागात शिवसेना भवनचा समावेश होत असल्याने या लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: पहिल्या तासात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात दुबार मतदार आढळला, मतदान केंद्रावर खळबळ, पुढं नेमकं काय झालं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल