अनेक वॉर्डांत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली. भाजपविरोधी मतांमध्ये विभागणी झाल्याचा फायदा महायुतीला होत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईत शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्यात आघाडीची घोषणा असली, तरी प्रत्यक्षात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. परिणामी अनेक वॉर्डांत मविआचे दोन-तीन उमेदवार परस्परविरोधी उभे राहिले. या परिस्थितीत मतांची विभागणी झाली आणि भाजपला कमी मताधिक्यानेही अनेक जागांवर विजय मिळवता आला.
advertisement
काँग्रेसने स्वबळावर उमेदवार दिलेल्या वॉर्डांत ठाकरे गटाच्या पारंपरिक मतांमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसून आले. काही ठिकाणी काँग्रेस उमेदवारांना मिळालेली मते निर्णायक ठरली.
प्रभाग क्रमांक 166 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मीनल तुर्डे यांनी विजय मिळवला. तर, दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे राजन खैरनार होते. मनसेच्या राजन खैरनार यांना ४४८० मते मिळाली. तर, शिवसेना शिंदे गटाच्या मीनल संजय तुर्डे यांना ६४३४ मते मिळाली. या मतदारसंघात काँग्रेसच्या घन:श्याम भापकर यांना ३२८६ मते मिळाली. तर, समाजवादी पक्षाच्या ११५३ मते मिळाली. या ठिकाणी ठाकरेंसोबत काँग्रेसची आघाडी असती तर निकाल वेगळा दिसला असता असे म्हटले जात आहे.
मुंबईतील काही वॉर्डमध्ये असेच चित्र दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. भाजप-शिंदे गटाविरोधातील मते विभागली गेल्याने ठाकरेंचा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
