मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. गेल्या काही निवडणुकांमधील मतमोजणीदरम्यान झालेला गोंधळ टाळण्यासाठी, आता एकाच वेळी सर्व वॉर्डांची मतमोजणी न करता ती दोन वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार आहे.
कशी होणार मतमोजणी?
शहरात एकूण २३ मतमोजणी केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर साधारण दहा प्रभागांची जबाबदारी एका मतमोजणी अधिकाऱ्याकडे असणार असली, तरी एका वेळी केवळ दोनच प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकाच वेळी जास्तीत जास्त ४६ प्रभागांचेच मतमोजणीचे काम सुरू राहणार आहे.
advertisement
> एकूण १४ टेबलावर मतमोजणी पार पडणार
कमीत कमी ४ तर जास्तीत जास्त ८ राऊंड मध्ये मतमोजणी पार पडणार. सुरुवातीला १९३ आणि १९४ प्रभागाची मतमोजणी पार पडेल. त्यानंतर १९५ आणि १९६, मग १९७ आणि १९८ तर सगळ्यात शेवटी १९९ प्रभागाची मतमोजणी होणार
> कोणत्या प्रभागाचे किती राऊंड होणार ?
१९३ प्रभागाचे ६ राऊंड
१९४ प्रभागाचे ८ राऊंड
१९५ प्रभागाचे ६ राऊंड
१९६ प्रभागाचे ७ राऊंड
१९७ प्रभागाचे ४ राऊंड
१९८ प्रभागाचे ६ राऊंड
१९९ प्रभागाचे ५ राऊंड
सुरुवातीला बॅलेट पेपरवरील मत मोजणी होणार आहे.
