मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत संध्याकाळ होताच अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रात एकतर्फी वाटणारी निवडणूक आता 'काँटे की टक्कर' मध्ये रूपांतरित झाली आहे. महायुतीने (भाजप-शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला तरी, अनेक वॉर्डांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने निकराची झुंज देत महायुतीची धाकधूक वाढवली आहे. भाजपने दुपारी विजयाच्या जल्लोषासाठी कार्यक्रम केला. मात्र, यावेळी मुंबई महापालिकेच्या विजयावर आक्रमकपणे भाष्य करणं टाळलं असल्याचे दिसून आले.
advertisement
>> मुंबई महापालिका निवडणूक - पक्ष निहाय माहिती कल/निकाल
> भाजपा ८२
> शिवसेना ठाकरे ६३
> शिंदे २६
> काँग्रेस २२
> एमआयएम ८
> समाजवादी पार्टी २
> मनसे ७
> राष्ट्रवादी २
> राष्ट्रवादी शरद पवार १
>> गिरणगावात 'ठाकरे' फॅक्टर जोरात!
मुंबईत भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी गिरणगावातील मतदारांनी मात्र ठाकरेंनाच पसंती दिली आहे. शिवडी आणि लालबाग विधानसभा क्षेत्रातील ६ महत्त्वाच्या वॉर्डपैकी ५ वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंनी (शिवसेना UBT आणि मनसे) विजय मिळवत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे.
