मुंबई: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे निकाल हाती येत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुंबईतील अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये विजयाचा झेंडा फडकवला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले असून यात महिला उमेदवारांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाने आघाडी केली होती. मनसेने मुंबईत ५२ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मात्र, अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाला देखील पराभवाचा धक्का बसला. ठाकरे बंधूंच्या (शिवसेना UBT आणि मनसे) युतीनंतर मुंबईत मनसेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विशेषतः उपनगरांमध्ये मनसेने चांगली लढत दिली.
advertisement
हाती आलेल्या निकाल, कलानुसार मनसे एकूण ९ जागांवर आघाडीवर आहे. मनसेला ६ जागांवर विजय मिळाला असून यामध्ये महिला उमेदवारांचा समावेश आहे. मनसेच्या या विजयामध्ये महिला उमेदवारांचा मोठा वाटा आहे. सुरेखा परब, विद्या आर्या आणि सई शिर्के यांनी आपल्या प्रभागात मतदारांशी थेट संवाद साधत विजय खेचून आणला. शिवसेना (UBT), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या समन्वयाचा फायदा काही जागांवर मनसेला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
>> मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी...
प्रभाग क्रमांक 38 मनसेच्या सुरेखा परब विजयी...
प्रभाग क्रमांक 74 मधून विद्या आर्या मनसेच्या उमेदवार विजयी...
प्रभाग क्रमांक 128 मनसेच्या सई शिर्के विजयी...
प्रभाग क्रमांक २०५ मधून मनसेच्या सुप्रिया दळवी विजयी
115 मधून मनसे ज्योती राजभोज विजयी...
प्रभाग क्रमांक 110 मनसे उमेदवार हरीनाक्षी मोहन चिराथ विजयी...
