TRENDING:

BJP Shiv Sena UBT Clash: मुंबईत प्रचाराला गालबोट, भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, राड्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर

Last Updated:

Shiv Sena UBT BJP Clash : मुंबईत प्रचाराला गालबोट लागल्याची घटना घडली. एका चौकसभे दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले असल्याची घटना घडली.

advertisement
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे. स्थानिक पातळीवरही कार्यकर्त्यांकडून आक्रमक प्रचार केला जात आहे. मुंबईत प्रचाराला गालबोट लागल्याची घटना घडली. एका चौकसभे दरम्यान भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले असल्याची घटना घडली.
मुंबईत प्रचाराला गालबोट, भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, राड्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर
मुंबईत प्रचाराला गालबोट, भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, राड्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर
advertisement

साकीनाका परिसरातील चांदिवली येथील संघर्षनगरमध्ये आयोजित ठाकरे गटाच्या चौक सभेदरम्यान भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन धक्काबुक्की व शिवीगाळ झाली. ही घटना मंगळवारी (६ जानेवारी) रात्री घडली. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघर्षनगर येथे ठाकरे गटाची चौक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी खुर्च्यांची मांडणी सुरू असतानाच भाजपच्या उमेदवार आशा तायडे यांच्या प्रचारासाठी आलेले काही कार्यकर्ते सभास्थळी मागील बाजूने आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाला सुरुवात झाली. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच परिस्थिती चिघळून धक्काबुक्की व हाणामारी झाली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

advertisement

ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या घटनेत भाजपचे विजू कोळी, वैशाली वैताडे, अनिष जाधव आणि सचिन जाधव यांचा सहभाग होता. या प्रकरणात पोलिसांनी राहुल सुर्वे यांच्यासह संबंधित सर्व कार्यकर्त्यांविरोधात परस्परविरोधी तक्रारींच्या आधारे गुन्हे दाखल केले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

दरम्यान, या घटनेचा सखोल तपास साकीनाका पोलिसांकडून सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Shiv Sena UBT Clash: मुंबईत प्रचाराला गालबोट, भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, राड्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल