तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रचार साहित्यामध्ये त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याने शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाशी निष्ठावान मानले जात असताना, त्यांच्या छायाचित्राचा भाजपच्या प्रचारासाठी वापर केला जात असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.
यावरून संतप्त शिवसैनिकांनी “अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजपप्रवेश झाला का?” असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. दिवंगत नेत्यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे चुकीचे असल्याचा आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे.
advertisement
''अभिषेकदादांनी मरणोत्तर भाजपात प्रवेश केलाय का?'' तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टरवरून राजकारण तापलं
तेजस्वी घोसाळकर यांनी १५ डिसेंबर रोजी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या ठाकरे गटाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे दहिसरमधील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता तेजस्वी घोसाळकर या भाजपच्या प्रचारात सक्रिय झाल्याने आता राजकारण आणखीच तापण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम उपनगरमधील उत्तर मुंबईत भाजपचे चांगलेच वर्चस्व आहे. एकसंध शिवसेनेची ताकद या ठिकाणी होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंना या भागात मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील फूट, त्यानंतर भाजप-महायुतीने ठाकरे गटाला चांगलेच धक्के दिले आहेत. मागील काही महिन्यात दहिसर–मागाठाणे परिसरात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या घटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
