मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून आज प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचा फटका अनेक दिग्गजांना बसला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका गाजवणाऱ्या या माजी नगरसेवकांना पुन्हा सभागृहात जाण्यासाठी दुसऱ्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.
advertisement
खुल्या प्रवर्गातील जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणच्या उमेदवारांना आता इतर पर्यायांची चाचपणी करावी लागणार आहे. प्रविण शाह, जगदीश ओझा, प्रविण शिंदे, सदानंद परब, असिफ झकारिया, मनोज कोटक, रमेश कोपरगावकर, पराग शाह, आशिष चेंबूरकर आदींचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत.
महिलांसाठी कोणत्या जागा राखीव?
महिला सर्वसाधारण गटासाठी पुढील वॉर्ड राखीव आहेत.
२, ८, १७७, १७९, ११५, १४, १५, ११६, ७१, ७३, १८०, १६, १२४, ७४, १८४, १७, १२६, १२७, २१, ७७, १९६, १९७, १९९, २०१, २४, ७८, १३१, २८, ७९, ८१, १३२, ३१, १३४, ८३, २०३, २०५, २०९, २१२, १३९, ३७, ८४, ८८, १४२, ३८, १४३, ३९, १५६, ४२, ९४, २१३, २१८, ९६, ९७, ६४, ६६, १५७, ४४, १६३, २२०, १७२, १७३, ५१, ५६, १०१, २२४, १०३, ६०, ६१, ११०, ११२, ११४, १७५, १७४, २२७
सर्वसाधारण प्रभाग खुला प्रभाग ७५ जागा...
३,५,७,९,२०,२२,२३,२५,२९,३०,३४,३५,३६,४०,४३,४७,४८,५४,५५,५७,५८,५९,६२,६५,६७,६८,७५,८६,८९,९०,९२,९८,९९,१०२,१०४,१०६,१०७,१०९,११९,१२०,१२२,१२३,१२५,१४४,१४५,१४८,१४९,१५४,१५९,१६०,१६१,१६२,१६४,१६५,१६६,१६८,१६९,१७८,१८१,१८५,१८८,१९०,१९२,१९४,२००,२०२,२०४,२०६,२०७,२१०,२११,२१४,२१७,२२१,२२५
> इतर संबंधित बातमी:
> मुंबई महापालिकेसाठी ओबीसींसाठी कोणत्या जागा राखीव, तुमच्या वॉर्डातील स्थिती काय?
> मुंबई महापालिकेसाठीची सोडत जाहीर, SC/ST प्रवर्गासाठी कोणते वॉर्ड राखीव? पाहा यादी
