BMC Election Reservation: मुंबई महापालिकेसाठीची सोडत जाहीर, अनुसूचित जाती, अजासाठी कोणते वॉर्ड राखीव? पाहा यादी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Election Reservation : आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महापालिकेत २२७ जागांपैकी ७४ जागा हा खुल्या गटासाठी असणार आहेत.
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. आज मुंबई महापालिकेसाठी निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे.
मुंबई महानगरपालिकेची सोडत आज वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंग मंदिर सभागृहात झाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील २२७ जागांपैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.
advertisement
आक्षण सोडतीनंतर राजकारण रंगणार...
आरक्षण सोडतीनंतरचे चित्र स्पष्ट झाल्यावर महापालिकांतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. या सोडतीनंतर काही ठिकाणी इनकमिंग-आउटगोईंग वाढण्याची शक्यता आहे. आपला वॉर्ड महिला आरक्षित झाल्यास त्या ठिकाणी पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी काही माजी नगरसेवकांनी केली आहे. तर, काही जणांनी पर्यायी वॉर्डची तयारी सुरू केली आहे.
advertisement
> मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांपैकी १५ प्रभाग अनुसूचित जातीकरिता आरक्षित
प्रभाग क्रमांक पुढील प्रमाणे : २६ , ९३, १४६ १५२, २१५, १४१, १४०
अनुसुचित जाती महिला प्रवर्ग राखीव : १५१, १८६, १५५ , १४७, १८९, ११८, १८३, १३३, १४०
> अनुसूचित जमातीसाठी कोणता प्रभाग आरक्षित?
प्रभाग क्रमांक ५३, (अजा), अनुसूचित जमाती महिला- १२१ आरक्षित
advertisement
>> मुंबई महापालिकेसाठी असं आहे आरक्षण
एकूण सदस्यसंख्या 227
महिलांसाठी राखीव 114
अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15 महिला 8
अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक
ओबीसी राखीव 61 महिला 31
सर्वसाधारण वॉर्ड 149 महिला राखीव 74
महामुंबईत ९ महापालिकांसाठी सोडत
advertisement
मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या महापालिकांचा समावेश आहे. त्याशिवाय पनवेल, मीरा-भाईंदर, वसई-विरार या महापालिकांसाठीदेखील आरक्षण सोडत निघणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 11, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election Reservation: मुंबई महापालिकेसाठीची सोडत जाहीर, अनुसूचित जाती, अजासाठी कोणते वॉर्ड राखीव? पाहा यादी


