TRENDING:

Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण

Last Updated:

Mumbai Mayor Reservation : महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही काळ तणावाचा वातावरण झाले होते. ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला

advertisement
मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, जाहीर झालेल्या आरक्षणात मुंबईचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित न झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. त्यामुळे काही काळ तणावाचा वातावरण झाले होते. ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यामागील आता कारण समोर आलं आहे.
अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
advertisement

ओबीसींवर अन्याय, ठाकरे गटाचा आक्षेप काय?

आदिवासी प्रवर्ग (ST) का वगळला? किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा प्रश्न 'एसटी' प्रवर्गाबाबत विचारला. "मुंबई महापालिकेत अनुसूचित जमातीचे (ST) दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला? महायुतीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जाणीवपूर्वक आदिवासी प्रवर्गाला वगळण्यात आले. अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागांचा नियम केला असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांच्या आधारेच लॉटरी काढण्यात आल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला.

advertisement

मुंबईचे महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) का आरक्षित केले नाही, यावरही ठाकरे गटाने आक्षेप घेतला. लोकसंख्येच्या प्रमाणात आणि चक्राकार पद्धतीनुसार ओबीसींना संधी मिळायला हवी होती, असे ठाकरे गटाने म्हटले होते.

८ जागांचे गणित आणि 'जळगाव'वर लागलेला ब्रेक

कायद्याच्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांपैकी २७ टक्के नियमानुसार ८ पदे ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करणे बंधनकारक होते. या प्रक्रियेत प्रशासनाने काही टप्पे निश्चित केले होते.

advertisement

नव्या शहरांना संधी

ज्या शहरांत आजवर एकदाही ओबीसी आरक्षण आले नव्हते, अशा शहरांना प्राधान्य देण्यात आले. यात पनवेल, इचलकरंजी आणि जालना शर्यतीत होते. मात्र, जालना 'एससी' प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने पनवेल आणि इचलकरंजी या दोन जागा ओबीसींसाठी निश्चित झाल्या.

अक्षरानुसार निवड

उर्वरित ६ जागांसाठी प्रशासनाने मराठी वर्णानुक्रम (अ, आ, क, ख...) पद्धत वापरली. यात अकोला, अहिल्यानगर, उल्हासनगर, कोल्हापूर, चंद्रपूर आणि जळगाव या सहा शहरांची वर्णी लागली.

advertisement

मुंबईचा 'ब' जळगावच्या 'ज' नंतर!

प्रशासकीय सूत्रांनुसार, वर्णक्रमानुसार नावे निश्चित करताना 'जळगाव' (ज) पर्यंत पोहोचताच ओबीसी प्रवर्गाचा ८ शहरांचा कोटा पूर्ण झाला. मुंबईचे अधिकृत नाव 'बृहन्मुंबई' असे आहे. मराठी वर्णमालेत 'ब' हे अक्षर 'ज' च्या खूप नंतर येते. जळगाववरच जागा संपल्याने मुंबईचे नाव या प्रक्रियेत येण्यापूर्वीच आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली.

advertisement

राजकीय आरोप-प्रत्यारोप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळींबाच्या दरात मोठी उलथापालथ, शेवगा आणि कांद्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

मुंबईचे महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित न झाल्याने उद्धवसेनेने सवाल उपस्थित केले आहेत. केवळ तांत्रिक नियमामुळे मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराला आरक्षणापासून दूर ठेवले गेले की यामागे काही राजकीय खेळी आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल