TRENDING:

जिथं BMC, हायकोर्ट आणि मंत्रालय, त्या वॉर्डात कुणाची सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती? ५ वर्षांनंतर पूर्णवेळ अधिकारी

Last Updated:

ए वॉर्ड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय विभाग असून येथे बीएमसी मुख्यालय, मंत्रालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांसारखी प्रमुख कार्यालये आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई: पाच वर्षांच्या कालावधीनंतर ए वॉर्डला अखेर पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त मिळणार असून गजानन बेल्लाळे लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. महापालिका प्रशासनाने याबाबतची नियुक्ती आणि बदलीच्या आदेश शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत.
गजानन बेल्लाळे कोण आहेत
गजानन बेल्लाळे कोण आहेत
advertisement

गत पाच वर्षाच्या कालावधीत ए वॉर्डचा कारभार दोन कार्यकारी अभियंत्यांनी हंगामी वॉर्ड ऑफिसर म्हणून सांभाळला. त्यात शेवटचे हंगामी वॉर्ड ऑफिसर जयदीप मोरे होते. नव्या निर्णयाचे कुलाब्याचे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी स्वागत केले. सप्टेंबर २०२५ मध्ये नार्वेकर यांनी बीएमसीकडे पूर्णवेळ वॉर्ड ऑफिसरची मागणी केली होती.

५ वर्षांनंतर पूर्णवेळ अधिकारी, भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना अत्यानंद

advertisement

सप्टेंबर २०२५ मध्ये नार्वेकर यांनी पूर्ण वेळ वॉर्ड ऑफिसर नेमण्याची मागणी करणारे पत्र बीएमसीकडे दिले होते. या कालावधीत अनेक प्रकल्प रखडले. त्यामुळे हा हाय-प्रोफाइल वॉर्ड असूनही विकासावर परिणाम झाला. आता पूर्णवेळ वॉर्ड ऑफिसर नियुक्त झाल्याने नागरी सेवा आणि विकासकामांमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा असल्याचे भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी सांगितले.

advertisement

A वॉर्डात BMC, हायकोर्ट आणि मंत्रालयासारखी महत्त्वाची कार्यालये

ए वॉर्ड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय विभाग असून येथे बीएमसी मुख्यालय, मंत्रालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांसारखी प्रमुख कार्यालये आहेत. तसेच गेटवे ऑफ इंडिया सारखी महत्त्वाची पर्यटनस्थळे या वॉर्डमध्ये असून येथे शहरातील सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते.

याआधी ए वॉर्डचा कार्यभार कुणीकुणी सांभाळला होता?

advertisement

चंदा जाधव या २०२१ पर्यंत पूर्णवेळ वॉर्ड ऑफिसर होत्या. त्यांच्या बदलीनंतर कार्यकारी अभियंते शिवदास गुरव आणि जयदीप मोरे यांनी हंगामी वॉर्ड ऑफिसर म्हणून काम पाहिले.

कोण आहेत गजानन बेल्लाळे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम
सर्व पहा

गजानन बेल्लाळे हे मुंबई महानगरपालिकेतील (BMC) एक वरिष्ठ अधिकारी आहेत. मार्च २०२६ मधील बदल्यांनुसार, त्यांची 'एन' विभाग (घाटकोपर) मधून 'ए' विभागात (कुलाबा, नरिमन पॉईंट) सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन बेल्लाळे यांची बदली ए वॉर्डात झाल्याने नार्वेकर यांनी अत्यानंद व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिथं BMC, हायकोर्ट आणि मंत्रालय, त्या वॉर्डात कुणाची सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती? ५ वर्षांनंतर पूर्णवेळ अधिकारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल