TRENDING:

BMC : कोणत्या समितीसाठी कुणाचे अर्ज दाखल, भाजपने कुणाकुणाला संधी दिली? संपूर्ण यादी

Last Updated:

मुंबई महापालिकेतील स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समिती यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विहित मुदत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत स्थायी समिती व सुधार समितीवर प्रत्येकी २६ सदस्यांची; शिक्षण समितीवर २२ महानगरपालिका सदस्यांची आणि ४ बिगर महानगरपालिका सदस्यांची तसेच 'बेस्ट' समितीवर १६ सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या चारही वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता महानगरपालिका सचिव कार्यालयाने विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांवर कुणाची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या विविध समित्यांवर कुणाची नियुक्ती
advertisement

आज (बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती आणि बेस्ट समिती यांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विहित मुदत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत होती. या कालावधीत प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. शुक्रवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी, तर दुपारी २ वाजता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. तर, सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुधार समिती अध्यक्षपदासाठी आणि दुपारी २ वाजता 'बेस्ट' समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

advertisement

कोणत्या समितीसाठी कुणाचा अर्ज, भाजपने कुणाकुणाला संधी दिली?

बृहन्मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोशी (सक्रे), बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती तृष्णा विश्वासराव यांनी आपले उमेदवारी अर्ज महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यांच्याकडे आज दाखल केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी पौष्टिक, सोप्या पद्धतीने घरीच बनवा सोयाबीन खिमा, रेसिपीचा Video
सर्व पहा

तृष्णा विश्वासराव यांनी आपला उमेदवारी अर्ज ‘बेस्ट’चे सह सचिव सुशील पवार यांच्याकडे आज (बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६) दाखल केला. यावेळी सभागृह नेते गणेश खणकर, नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थि‍त होते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC : कोणत्या समितीसाठी कुणाचे अर्ज दाखल, भाजपने कुणाकुणाला संधी दिली? संपूर्ण यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल