TRENDING:

बोगस मतदाराला चोपलं, पोलिसांसोबत राडा, रक्षा खडसेंचं रौद्ररुप, मतदानाच्या दिवशी काय काय घडलं?

Last Updated:

मतदान करत असताना अनेक ठिकाणी मतदानातील बोगसगिरी उघड झाली. काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. याच्याही पुढे जात काही ठिकाणी चक्क पोलिसांसोबतही राडा झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आज राज्यभरात अनेक ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पण मतदान करत असताना अनेक ठिकाणी मतदानातील बोगसगिरी उघड झाली. तर काही ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. याच्याही पुढे जात काही ठिकाणी चक्क पोलिसांसोबतही राडा झाला आहे. राज्यात मतदानाच्या दिवशी कुठे काय घडलं? याचा सविस्तर आढावा
News18
News18
advertisement

बार्शीत बोगस आधार कार्ड वापरून मतदान

बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. बार्शीतील एका गावात बोगस आधार कार्ड वापरून मतदान केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. बार्शी नगरपरिषदेच्या निवडणुकीत जामगाव (आ) येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचा आरोप सोपल यांनी केला. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात बोगस व्यक्तीने मतदान केलेल्या व्यक्तीच्या नावासहीत आरोप केलाय. सर्व प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

advertisement

शिर्डीत बोगस मतदान

शिर्डीत एका महिलेच्या नावाने बोगस मतदान झाल्याचं समोर आलं आहे. शोभा सुनील शिंदे या महिलेच्या नावाने बोगस मतदान झालं. शोभा शिंदे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहचण्याआधीच त्यांच्या नावाने कुणीतरी मतदान केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मूळ मतदार शोभा शिंदे संतप्त झाल्या. यामुळे शिर्डीतील मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.

advertisement

बुलढाण्यात बोगस मतदाराला चोप चोप चोपलं

बुलढाण्यात मतदान करण्यासाठी आलेल्या एका बोगस मतदाराला पकडून नागरिकांनी बेदम चोप दिला आहे. यावेळी काही नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. काही लोकांनी संतप्त नागरिकांच्या तावडीतून बोगस मतदाराला सोडवून पळवून लावलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

advertisement

हिंगोलीत संतोष बांगरांकडून आचारसंहितेचा भंग?

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा देखील आरोप झाला आहे. मतदान केंद्रात गेल्यानंतर बांगर यांनी एका महिलेला मतदान कसं करायचं? हे दाखवताना दिसले. शिवाय त्यांनी फोनही आपल्यासोबत नेला होता, यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होत आहे.

पंढरपुरात EVM मशीनवर कमळासमोर आढळल्या खुणा

advertisement

पंढरपुरातील उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान करताना गोंधळ पाहायला मिळाला. कारण मतदान केंद्रावरील बॅलेट पेपरवरच कमळ चिन्हासमोर खुणा केल्याने आक्षेप तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार प्रणिता भालके यांनी घेतला. तसेच मतदान केंद्रावर कमळ चिन्हाच्या मतदार स्लीपही आढळून आल्या. महत्त्वाची बाब म्हणजे पोलीसच अशा स्लिप मतदारांना देत असल्याचा आरोपही भालके यांनी केलाय. त्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष, पोलीस आणि भालके यांच्या समक्ष EVM मशीनवरील बॅलेटपेपरवर आणि मतदार केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. याबाबत मशीन बदलून मागितली द्यावी. अशीही मागणी भालके यांच्याकडून करण्यात आली होती.

वर्ध्यात भाजप कार्यकर्त्याने पळवलं वृद्धेचं आधार कार्ड

वर्ध्याच्या पुलगाव शहरात भाजपच्या एका कार्यकर्त्याने वृद्ध महिलेचं आधार कार्ड पळवून नेल्याचा आरोप आहे. मतदानाच्या एक दिवस आधी भाजपा कार्यकर्त्याने आधार कार्ड नेल्याचा आरोप आहे. आधार कार्ड नेत मतदानाला घेऊन जाऊ, असं आश्वासन भाजप कार्यकर्त्याने दिला होता. मात्र गोंधळ उडताच संबंधित कार्यकर्ता आधार कार्ड घेऊन परत आला. मात्र या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाकडून कारवाईची मागणी केली. यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.

बीडमध्ये पैसे वाटल्याचा आरोप

बीडच्या माजलगावमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याचे आरोपावरून दोन गटाने सामने आहे. यामुळे वार्ड क्रमांक पाच मध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना शांत राहण्याचं पोलिसांनी आवाहन केलं.

मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातलं असं मंदिर, बाल हनुमानाचं वर्षातून अडीच दिवस दर्शन, Video
सर्व पहा

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताई नगरमध्ये भाजपच्या खासदार आणि मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणातून रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. या प्रकारामुळे जुन्या शहरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बोगस मतदाराला चोपलं, पोलिसांसोबत राडा, रक्षा खडसेंचं रौद्ररुप, मतदानाच्या दिवशी काय काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल