अलीकडेच वीज चोरीच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या एका मुस्लिम व्यक्तीला हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती अभय एस. वाघवासे यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने अर्ज मंजूर केला. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले की, अपील 2016 पासून प्रलंबित आहे आणि अटींच्या अधीन राहून याचिकाकर्ता एप्रिल ते सप्टेंबर 2025 पर्यंत धार्मिक तीर्थयात्रा करू शकतो असा निर्णय दिला.
advertisement
छत्रपती संभाजीनगर येथील 43 वर्षीय व्यापारी रहीम खान सांडू खान यांना 2007 मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी ऑक्टोबर 2016 मध्ये भारतीय वीज कायद्याच्या कलम 135 अंतर्गत दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु त्यांच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या अपील दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
याचिकेला सरकारी वकिलांकडून विरोध नाही...
हज यात्रेसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागणारा अर्ज याचिकाकर्त्याने सादर केला होता. याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करणारे वकील जॉयदीप चॅटर्जी यांनी असा युक्तिवाद केला की नजीकच्या भविष्यात अपीलवर सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे आणि खान यांच्या कुटुंबातील सदस्यांना, ज्यात त्यांची पत्नी, भाऊ आणि मेहुणी यांचा समावेश आहे. हज समितीने आधीच यात्रेसाठी जागा वाटप केल्या आहेत. सरकारी वकिलांनी या विनंती अर्जावर कोणताही आक्षेप घेतला नाही.
कोर्टाने निकालात काय म्हटले?
न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला. कोर्टाने म्हटले की, “अपील 2016 सालचे असल्याने आणि धार्मिक कारणांसाठी सुनावणीसाठी अपील घेण्याची तात्काळ शक्यता नसल्याने, अर्ज मंजूर करण्यास पात्र असल्याचे म्हटले. न्यायालयाने खान यांना हज यात्रेसाठी एप्रिल ते सप्टेंबर 2025 पर्यंत परदेशात जाण्याची परवानगी दिली. याव्यतिरिक्त, न्यायालयाने काही अटी लादल्या आहेत. यामध्ये दिलेल्या परवानगीचा गैरवापर करणार नाही अशी हमी देणे, सौदी अरेबियातील त्याच्या प्रवासाचा मार्ग, तिकिटे, विमान सेवा आणि निवासस्थानाची माहिती यंत्रणांना देणे आणि निघण्यापूर्वी त्याच्या मालकीच्या मालमत्तेची माहिती पोलिस आणि न्यायालयाला सादर करणे अशा अटी देण्यात आल्या आहेत.
