आई... आई... चिमुकला हुंदके देत राहिला. त्याचा हाटो पाहून आजूबाजूच्या लोकांना गहिवरुन आलं. पण त्याच्या मनावर काय जात होतं याची कल्पनाही करु शकत नाही. मन सुन्न करणारी घटना बुलढाण्यात घडली आहे. कौटुंबिक कलह आणि जाचाला कंटाळून महिलेनं मुलाच्या डोळ्यादेखत आपलं आयुष्य संपवलं. आयुष्य संपवण्याची पद्धतही इतकी भीषण होती की त्या मुलाच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचार केला तरी अंगावर काटा येईल.
advertisement
मुलाला समोर बसवलं आणि महिलेनं थेट धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. रक्ताचा सडा उडाला, शरीराचे तुकडे झाले, रक्तबंबाळ आईकडे चिमुकला पाहात हुंदके देत होता. त्याची आई त्याला कायमची सोडून गेली होती. कौटुंबिक कलहाची इतकी भीषण शिक्षा या महिलेनं आपल्या मुलाला दिली. कौटुंबिक कलहातून मनस्ताप झालेल्या महिलेनं हे टोकाचं पाऊल उचललं.
स्वतःच्या चिमुकल्याला रेल्वे स्टेशनवर बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन आयुष्य संपवलं. ही हृदयद्रावक घटना बुलढाण्यातील जलंब रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. कल्पना विठ्ठल घुले वय वर्ष 22 असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला स्थानिक रहिवासी होती.
कौटुंबिक वादामुळे रागाच्या भरात कल्पना आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन रेल्वे स्टेशनकडे निघाली. रेल्वे रुळावरून मालगाडी येत असल्याचे पाहताच तिने चिमुकल्याला कडेवरुन खाली उतरले आणि बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवलं. आपली आई रेल्वे खाली उडी घेत असल्याचे त्या चिमुकल्याने उघड्या डोळ्यांनी पाहिलं मन्न सुन्न करणारी ही घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली.