अमरावती जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर तरुणी बारलिंगा गावात आली होती. पीडित तरुणी चे सिंदखेड राजा तालुक्यातील बारलिंगा येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र प्रियकर फोन उचलत नसल्याने थेट तरुणीने त्याचे घर गाठले. प्रियकराच्या घरी येऊन घरच्यांना त्याबद्दल विचारले. यावेळी प्रियकराच्या घरच्यांसोबत तिचा वादही झाला. तेव्हा प्रियकराच्या घरच्या लोकांनी तिला अश्लील शिवीगाळ करत जबर मारहाण केली.
advertisement
वाघाच्या बछड्याला धडकली कार, धडपडत रस्ता ओलांडला पण काळाने गाठलं; घटनेचा VIDEO समोर
याप्रकरणी तरुणीने पोलिसात तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मारहाण करत विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने तरुणासह त्याच्या कुटुंबियांवर केला आहे. आरोपींची नावे गणेश जायभाये, लता जायभये, बद्रिनाथ जायभाये अशी आहेत. तरुणीने तक्रार दाखल केली असून आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसंच आरोपींचा शोध घेतला जात आहे.
