वाघाच्या बछड्याला धडकली कार, धडपडत रस्ता ओलांडला पण काळाने गाठलं; घटनेचा VIDEO समोर

Last Updated:

अनेक ठिकाणी जंगली प्राणी मानवी वस्तीकडे येऊन दहशत माजवत आहेत. त्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. तर कधी माणसांकडून प्राण्यांना इजा पोहचवली जाते.

वाघाच्या बछड्याला धडकली कार
वाघाच्या बछड्याला धडकली कार
रवी सपाटे, गोंदिया, 11 ऑगस्ट : अनेक ठिकाणी जंगली प्राणी मानवी वस्तीकडे येऊन दहशत माजवत आहेत. त्यांच्या हल्ल्याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. तर कधी माणसांकडून प्राण्यांना इजा पोहचवली जाते. एक घटना समोर आलीय ज्यामध्ये कारच्या धडकेत एक वाघ गंभीर जखमी झाला. धडक एवढी जबर होती की काही वेळातच वाघाचा मृत्यू झाला.
समोर आलेली घटना गोंदियातील कोहमारा हायवे मधील मुर्दोली परिसरामध्ये घडली. रात्री 10,10:30 च्या दरम्यान creta कारच्या धडकेत एक नर वाघ गंभीर जखमी झाला. उपचारा करिता नागपूरला हलवताना वाटेतच वाघाचा मृत्यू झाला.
पुढील postmortem आणि procedure नागपूर गोरेवाडा येथे होणार आहे. मुर्दोली परिसरात नेहमी वाघांचे आवागमन होते, सदर परिसरात हायवे मुळे नेहमी वन्य प्राणी मृत्यू मुखी पडतात व एखाद्या घटनेत वाघ पण जावू शकतात याची आधीच शक्यता वर्तवली होती. सदर रोड नागझिरा - नवेगाव कॉरिडॉर मधील पूर्व नागझिरा परिसरातून जातो आहे. तिथे आता लवकर उपाय योजना करण्याची गरज आहे.
advertisement
दरम्यान, रस्त्यावर अचानक गाडीसमोर आलेल्या प्राण्यांना दुखापत होते किंवा अशा धडकेत त्यांचा जीवही जातो. वाघ हा नागझिरा तील T14 वाघिणीचा 2 वर्षाचा निम्नवयस्क बछडा होता. या घटनेता व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यामध्ये वाघ जखमी झालेला दिसत आहे. तो कसाबसा रस्ता पार करण्याचा प्रयत्न करतो. जबर बसलेल्या धडकेमुळे वाघाला खूप दुखापत झाल्याचंही दिसत आहे. दुर्देवानं या धडकेत झालेल्या जखमेमुळे वाघाचा मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/गोंदिया/
वाघाच्या बछड्याला धडकली कार, धडपडत रस्ता ओलांडला पण काळाने गाठलं; घटनेचा VIDEO समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement