TRENDING:

Madhya Pradesh Fire Incident: चारधाम यात्रेकरूंच्या बसचा जळून कोळसा; चालकाच्या हुशारीने वाचले 30 जीव, घटनास्थळाचा Live Video

Last Updated:

Madhya Pradesh Fire Incident: मध्यप्रदेश येथील शिवपुरीजवळ बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांची लक्झरी बस जळून खाक झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलडाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : मागच्या वर्षी समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर बसला आग लागल्याने 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातासारखीच एक घटना मध्य प्रदेश घडली. सुदैवाने यात कोणतीही जीविताहानी झाली नाही. या बसमध्ये 30 भाविक चारधाम यात्रेसाठी निघाले होते. मध्यप्रदेश येथील शिवपुरीजवळ बुलढाणा जिल्ह्यातील भाविकांची लक्झरी बस जळाल्याची घटना घडली. बुलढाण्यातील भाविक चारधाम यात्रेसाठी निघाले होते. तेव्हा त्यांच्या बसला आग लागली. या आगीत बसचा जळून कोळसा झाला.
चारधाम यात्रेकरूंच्या बसचा जळून कोळसा
चारधाम यात्रेकरूंच्या बसचा जळून कोळसा
advertisement

समृद्धी महामार्ग अपघाताची पुनर्रावृत्ती टळली

बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी 2 लक्झरी बस निघाल्या होत्या. यापैकी एका बसला मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस नजीक शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान समय सुचकता राखत सर्व भाविक बसमधून बाहेर पडल्याने बचावले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ‘समृद्धी’ महामार्गावरील गतवर्षीच्या अपघाताची मध्यप्रदेशमध्ये होणारी पुनर्रावृत्ती टळली.

advertisement

वाचा - पुण्यात बँड पथकावर कोसळलं भलंमोठं होर्डिंग! नवरदेवाचा घोडाही अडकला; थरकाप उडवणारे PHOTOS

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातून दोन लक्झरी बसद्वारे 60 भाविक केदारनाथ यात्रेसाठी 15 मे रोजी निघाले होते. एका बसमध्ये धामणगाव बढे येथील तर आग लागलेल्या बसमध्ये बुलडाणा येथील भाविक होते. मध्यप्रदेशातील शिवपुरी ते गुणा या फोरलेन महामार्गावरील कोलारस पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैरसिया क्रॉसिंगनजीक बसमधून धुर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने चालकाने बस थांबवली व सर्व भाविकांना सुखरूप खाली उतरवले. बसमधील सर्वच्या सर्व 30 भाविक सुखरुपपणे उतरण्यात यशस्वी झाल्याचे भाविकांपैकी एकाचे नातेवाईक असलेल्या उल्लास बढे पाटील यांनी सांगितले. या बसमध्ये 18 महिला व 12 पुरुषांचा समावेश होता. दरम्यान बसने चांगलीच आग पकडली होती. कोलारस पालिकेच्या अग्निश्यामक दलाने नंतर ही आग विझवली. परंतु, बस पुर्णत: जळून खाक झाली आहे. बसच्या एसीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन ही आग लागल्याची चर्चा यात्रेकरूपैकी एकाने बोलून दाखवली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Madhya Pradesh Fire Incident: चारधाम यात्रेकरूंच्या बसचा जळून कोळसा; चालकाच्या हुशारीने वाचले 30 जीव, घटनास्थळाचा Live Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल