बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंत शैल्य चिकित्सक डॉ. निलेश रामराव माळोदे याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता. सदर नववधूला होळीचा सण देण्याकरिता रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. निलेश रामराव माळोदे व संगीता रामराव माळोदे हे तिघे कारने इंदोर येथे कार्यक्रम आटपून परत बाळापूर येथे येत होते. त्यावेळी गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्या कारवर काळाने घाला घातला. अकोलाकडून खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चार वेळा पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. या अपघातात डॉ. निलेश माळोदे व त्याची आई संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील रामराव माळोदे हे गंभीर स्वरूपाने जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारात दाखल केले आहे.
advertisement
भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघाती मृत्यू
पनवेल खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून परतताना मामाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (30 मार्च) जेएनपीए महामार्गावर दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. यावेळी अपघात स्थळावर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला. ही भयानक अपघात रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत आहे.
वाचा - साताऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुली बुडाल्या; दोन मुलींचा मृत्यू तर एकीला वाचवण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार उरण तालुक्यातील मोठी जुई गावातील माजी उपसरपंच वसंत तुळशीराम भोईर हे शनिवारी पनवेल येथील खांदा गावातून आपल्या भाच्याच्या लग्न समारंभातून पलस्पे - जेएनपीए महामार्गावरून आपल्या मोटारसायकलवरून मोठी जुई गावाकडे दुपारी ठिक तीनच्या सुमारास येत होते. वसंत भोईर हे मुंबई शहराकडे जाणाऱ्या अटल सेतू या चिर्ले गावाजवळील उड्डाण पूला वळ आले असताना महामार्गावर बेकायदेशीर पार्किंग केलेल्या मालवाहू ट्रेलरला त्यांच्या मोटारसायकने धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात वसंत भोईर हे जागीच मृत्युमुखी पडले. या अपघाताची माहिती मिळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केला.
