Satara News : साताऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुली बुडाल्या; दोन मुलींचा मृत्यू तर एकीला वाचवण्यात यश

Last Updated:

Satara News : महाबळेश्वर तालुक्यातील शिवसागर जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली बुडाल्या. यातील दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकीला वाचवण्यात यश आलं आहे.

3 मुली बुडाल्या
3 मुली बुडाल्या
सातारा, (सचिन जाधव, प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर लगेच मुलींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
शिवसागर जलाशयात मुली बुडाल्या
सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत असलेल्या शिवसागर जलाशयात आज दुपारी तीन मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना पाण्याच्या बाहेर काढून लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे वेंगळे गावावर शोक काळा पसरली आहे. याची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
Satara News : साताऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुली बुडाल्या; दोन मुलींचा मृत्यू तर एकीला वाचवण्यात यश
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement