TRENDING:

Buldhana News : शिंदे गटाच्या आमदाराची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा, लोकसभेआधी वातावरण तापलं

Last Updated:

Buldhana News : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात राजकरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलडाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजून लोकसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. मात्र, आत्तापासूनच राजकीय वाद टोकाला जात असल्याचे चित्र बुलढाण्यात पाहायला मिळतोय. शिंदे गटाचे मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांनी लोकसभेचे भावी उमेदवार रविकांत तुपकर यांना कानशिलात लगावण्याची भाषा केली आहे. या धमकीला रविकांत तुपकर यांनी तातडीने प्रत्युत्तर देत असल्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं रविकांत तुपकर म्हणाले.
तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा
तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा
advertisement

शिवसेना आमदाराची तुपकरांना धमकी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या तयारीला लागलेत. आगामी लोकसभा निवडणुक कुठल्याही परिस्थितीत आपण लढवणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी जाहीर केलं आहे. गेल्या काही काळात रविकांत तुपकरांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली. मात्र, रविकांत तुपकर शासनाची मदत शेतकऱ्यांना मिळणार असते, तेव्हाच आंदोलने करतात, रविकांत तुपकर यांच्या वकील पत्नी शर्वरी तुपकर यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापाऱ्याचे वकीलपत्र घेतले असा गंभीर आरोप करत शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी रविकांत तुपकरांच्या कानशिलात लगावण्याची धमकी दिली आहे.

advertisement

रविकांत तुपकर हे आगामी लोकसभेचे उमेदवार मानले जात आहेत. तर मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर हे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील राजकारण कडाक्याच्या थंडीत तापायला लागलंय. आमदार संजय रायमुलकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार संजय रामुलकरांच्या असल्या धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

advertisement

वाचा - गांधींची हत्या नथुरामने केली नाही? सावरकरांच्या दाव्यावर आव्हाड संतापले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

गेल्या तीन टर्मपासून बुलढाणा लोकसभेवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्रतापगड शाबूत ठेवण्यासाठी आमदार संजय रायमुलकरांनी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे. याप्रकरणी आतापर्यंत प्रतापराव जाधव यांनी माध्यमांसमोर बोलायचं टाळलं आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सुरू झालेले हे वाकयुद्ध एवढ्यात थांबेल असं वाटत नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana News : शिंदे गटाच्या आमदाराची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा, लोकसभेआधी वातावरण तापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल