हे वाचायला विचित्र वाटत असलं तरी अशीच एक घटना आता समोर आली आहे. ही घटना बुलडाण्यात घडली आहे. यात एका सरपंच पतीने चक्क शाळेवरील कौलच विकले. बुलडाणा जिल्ह्यातील निवाना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील मंगलोरी कौल चक्क सरपंच पतीने विकून टाकले. तशी तक्रार उपसरपंचासह काही ग्रामपंचायत सदस्यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे केली आहे
advertisement
रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं आणि....
ग्रामपंचायतची कुठल्याच यंत्रणेची परवानगी न घेता आपल्या पत्नीच्या पदाचा दुरुपयोग करून सरपंच पतीने चक्क जिल्हा परिषद शाळेवरील मंगलोरी कौल विकून टाकले आहेत. सदर घटनेची ग्रामसेवकानेदेखील कुठलीच सूचना दिली नाही. त्यामुळे याप्रकरणी संबंधित सरपंच पतीवर आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे
गोंदियात जावयानं सासऱ्याचं घर पेटवलं
गोंदियामधूनही एक विचित्र घटना समोर आली होती. यात रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. यामुळे चांगलीच खळबळ उडाली. जावयानं सासऱ्याचं घर जाळल्याची घटना गोंदियामधून समोर आली. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्राम डवकी गावात जावयानेच आपल्या सासरच्या घराला आग लावली वेळेवर आग विझविण्यात आली मात्र या आगीत मोटारसायकल जळाली.
