रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं आणि....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
घरगुती वादाच्या अनेक घटना समोर येत असतात. रागात लोक कधी काय करतील याचा अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा लोक रागाच टोकाचं पाऊल उचलतात.
रवी सपाटे, गोंदिया, 28 सप्टेंबर : घरगुती वादाच्या अनेक घटना समोर येत असतात. रागात लोक कधी काय करतील याचा अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा लोक रागाच टोकाचं पाऊल उचलतात. अशा वादाच्या घटना कायमच समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आलीय ज्यामध्ये रागात जावयानं चक्क सासरऱ्यांचं घरच पेटवलं. ही घटना समोर आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया.
जावयानं सासऱ्याचं घर जाळल्याची घटना गोंदियामधून समोर आलीय. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील ग्राम डवकी गावात जावयानेच आपल्या सासरच्या घराला आग लावली वेळेवर आग विझविण्यात आली मात्र या आगीत मोटारसायकल जळाली.
डवकी या गावात राहणारे शंकर राऊत व परिवारातील सदस्य हे रात्री झोपी गेले असतांना रात्री 12 वाजता दरम्यान घराबाहेर अचानक स्पोट झाल्याचा आवाज आल. आवाज येताच शंकर राऊत यांनी घराबाहेर येऊन पाहिलं तर समोर ठेवलेल्या दोन मोटरसायकल आणि घराच्या समोरील छतास आग लागली होती. त्यांनी आरडा-ओरडा करताच परिसरातील लोक जमा झाले. नागरिकांनी आग विजवायला मदत केली. आग कोणी लावली याचा शोध घेत असताना त्यांना शंकर राऊत यांचे जावई नितेश मधुकर शहारे हा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आलं. लोकांना पाहताच त्यांनी तिथून पड काढला.
advertisement
रागात जावयानं उचललं मोठं पाऊल, सासऱ्याचं घर पेटवलं; गोंदियातील घटना#shocking #gondia #news18marathi pic.twitter.com/BQtwwsjvnG
— News18Lokmat (@News18lokmat) September 28, 2023
दरम्यान, या घटनेची तक्रार देवरी पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. देवरी पोलिसांनी पंचनामा करीत फरार असलेला आरोपी जावई याचा शोध पोलीस घेत आहे. यापूर्वीही त्यानं दारुच्या नशेत सासरच्या मंडळींना शिवीगाळ केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2023 12:49 PM IST


