खाऊचं आमिष देत चिमुकलीचं अपहरण; 48 तास अन् 150 CCTV फुटेज, पोलिसांनी असं शोधून काढलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथवर राहणाऱ्या 4 वर्षांच्या लहान मुलीचं एका व्यक्तीने अपहरण केलं.
प्रमोद पाटील, नवी मुंबई 28 सप्टेंबर : लहान मुलांच्या अपहरणाच्या अनेक बातम्या समोर येत असतात. या चिमुकल्यांना चांगलं आणि वाईट याची फार समज नसते. त्यामुळे पालकांना प्रत्येक वेळी सावध राहून आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं लागतं. त्यांच्याकडे थोडंही दुर्लक्ष झालं तरी अनेकदा मोठ्या दुर्घटना घडतात. असंच एक प्रकरण आता नवी मुंबईतून समोर आलं आहे.
नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्टेशन समोरील फुटपाथवर राहणाऱ्या 4 वर्षांच्या लहान मुलीचं एका व्यक्तीने अपहरण केलं. त्याने खाऊचं आमिष देऊन तिचं अपहरण केलं. यानंतर मुलीला घेऊन परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला नेरुळ पोलिसांनी 48 तासाच्या आत अटक केली आणि 4 वर्षीय मुलीची सुटका केली आहे.
advertisement
74 वर्षीय मणी थॉमस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. नेरुळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा माग काढत त्याला करावे गावातून जेरबंद केलं आहे. आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीला परराज्यात नेऊन विकण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या 4 वर्षीय मुलीला नेरुळ पोलिसांनी शोधून काढलं आणि तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं.
advertisement
या घटनेनंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी 48 तासात 150 सीसीटीव्ही फुटेज तपासत या मुलीला आरोपीच्या तावडीतून वाचवलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 28, 2023 12:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
खाऊचं आमिष देत चिमुकलीचं अपहरण; 48 तास अन् 150 CCTV फुटेज, पोलिसांनी असं शोधून काढलं







