अक्षय गवते यांच्या वडिलांची खंत
राहुल गांधींच्या या दाव्यानंतर आता शहीद अग्निवीर अक्षय गवते यांच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथील पहिला अग्निवीर शहीद अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी त्यांना एकूण 1 कोटी 10 लाख रुपयांची भरपाई मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत त्यांना विम्याचे 50 लाख रुपये इतर 50 लाख आणि राज्य सरकारकडून 10 लाख असे 1 कोटी 10 लाख रुपये त्यांना मिळाले असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, त्याचवेळी अजूनही अक्षय गवतेला शहीद हा दर्जा शासनाकडून देण्यात आला नसल्याची खंत अक्षय गवते यांच्या वडिलांनी व्यक्त केली.
advertisement
अग्निवीरच्या कुटुंबाला किती मदत मिळते?
लष्कराच्या वेबसाइटनुसार, अग्निवीरचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्याला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण, 44 लाख रुपये अनुग्रह रक्कम, चार वर्षांसाठी पूर्ण वेतन आणि सेवा निधी सोबतच सरकारमध्ये जमा केलेल्या रक्कम आणि सरकारचं योगदान दोन्ही मिळते.
वाचा - विधानपरिषदेत शिवीगाळ करणे दानवेंच्या अंगलट; उपसभापती गोऱ्हेंनी घेतला मोठा निर्णय
कर्तव्यावर नसताना अग्निवीरचा मृत्यू झाला तर कुटुंबाला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते. त्याच वेळी, अपंगत्वाच्या बाबतीत, अग्निवीरला अपंगत्वाच्या पातळीनुसार (100%, 75% किंवा 50%), पूर्ण पगार आणि सेवा यावर अवलंबून 44 लाख रुपये, रुपये 25 लाख किंवा रुपये 15 लाख रुपये मिळतील. तसेच चार वर्षांपर्यंतचा निधी आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचे योगदान मिळते.
