TRENDING:

Maharashtra Politics: महायुती, मविआला टक्कर देण्यासाठी बच्चू कडूंची 'तिसरी आघाडी'? विदर्भातील नेत्याचं मोठं विधान

Last Updated:

महायुती, मविआला टक्कर देण्यासाठी बच्चू कडूंची 'तिसरी आघाडी'? तुपकरांच्या दाव्यामुळे खळबळ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 बुलढाणा: महाराष्ट्राच्या राजकारणात आता कधी काय घडेल, याचा काही नेम राहिलेला नाही. त्या भर म्हणजे आता बुलढाणा जिल्ह्यातील नेते रविकांत तुपकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. "राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतील टक्कर देण्यासाठी प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू तिसरी आघाडी तयार करत आहेत, असं त्यांनी म्हटलंय" आता राज्याच्या राजकारणात एवढी मोठी घडामोड घडत असताना त्यावर अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
News18
News18
advertisement

काय म्हणाले तुपकर ? स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींशी काडीमोड घेतल्यानंतर आज तुपकर यांनी बुलढाण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी बोलतना प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांच्याशी आपली गुप्त भेट झाली असल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला. "zबच्चू कडू राज्यात महायुती आणि महाविकास आघाडील टक्कर देण्यासाठी तिसरी  आघाडी निर्माण करत आहेत. आपण त्यांना साथ देणार आहोत. याच मुद्द्यावर माझ्या संपर्कात राज्यातील काही बडे नेते, आजी- माजी आमदार आहेत." असा दावा तुपकर यांनी केली आहे.

advertisement

बुलढाण्यात 6 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार -तुपकर रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पूर्वाश्रमीचे प्रमुख नेते आहेत. बुलढाणा जिल्ह्यात तुपकर यांचा राजकीय प्रभाव देखील मोठा आहे. नाराजी आणि संघटनेशी संबंधित  विविध मुद्द्यांवर वर्षभरापूर्वी तुपकर यांनी काडीमोड घेतला होता. आता तुपकर आपली स्वतंत्र ताकद बुलढाण्याच्या राजकारणात अजमावणार आहेत. आपण जिल्ह्यातील विधानसभेच्या 6 जागांवर उमेदवार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तुपकरांचे किती उमेदवार विजयी होणार? त्यांना मिळणाऱ्या मतांचे प्रमाण किती असेल, यावर महायुती आणि मविआच्या काही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

advertisement

तिसरी आघाडी झाली तर...प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे आपल्या खुल्या स्वभावामुळे आणि त्यांनी सरकारी धोरणांना अनेकदा केलेल्या विरोधामुळे नेहमीच चर्चेत असतात. बच्चू कडू यांनी आपलं उपद्रव मुल्य लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये अधोरेखित केलं आहे. कडूंनी दिलेल्या उमेदवारामुळे नवनीत राणांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे बच्चू कडूंनी जर राज्यात तिसरी आघाडी निर्माण केली तर निश्चितच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काही उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.

advertisement

आता बच्चू कडू खरंच तिसरी आघाडी स्थापन करणार असतील तर महायुतीचे नेते त्यांनी यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतील ही बाब स्पष्ट आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Maharashtra Politics: महायुती, मविआला टक्कर देण्यासाठी बच्चू कडूंची 'तिसरी आघाडी'? विदर्भातील नेत्याचं मोठं विधान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल