शिंदे गटाचा शरद पवारांना टोला
टी 20 वर्ल्ड कप आपल्या नावावर कोरल्यानंतर भारतीय संघातील रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी 20 सामन्या मधील आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्यावर शरद पवार यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी योग्य वेळी निवृत्तीची घोषणा केली असल्याच म्हटल आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी शरद पवार यांना उलट सवाल करत शरद पवार यांचे वय झालं आहे. दुसऱ्यांच्या निवृत्तीला शरद पवार सर्टिफिकेट देत आहे, ती चांगली गोष्ट आहे. मात्र, आता शरद पवार हे केव्हा निवृत्ती घेतात हे त्यांनी जाहीर करावं, असं आव्हान शरद पवार यांना प्रतापराव जाधव यांनी दिलं आहे. त्यावर आता शरद पवार प्रतापराव जाधव यांच्या आव्हानाला काय प्रत्युत्तर देतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
advertisement
रोहित-विराटची निवृत्ती
अंतिम सामन्यात 16 व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड होतं. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली आणि सामना जिंकून दिला. अंतिम सामन्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, सुरुवातीला धावसंख्या पाहिल्यानंतर चिंता वाटावे अशी स्थिती होती. जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि यादव यांनी चांगली कामगिरी केली. t20 च्या विजेतेपदाच्या दुष्काळातून भारताची मुक्तता झाली.
भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोन धक्के बसले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित विराटने नवोदितांना संधी मिळावी आणि जे मिळवायचं होतं ते मिळवलं असं म्हणत निवृत्ती जाहीर केली. शरद पवार यांना रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत विचारले असता पवार म्हणाले की, ते t20 मधून रिटायर होत आहेत. दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू. फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असतं.
वाचा - इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला; पती-पत्नीची अशीही कामगिरी
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे. आता टी20 मधून निवृत्ती घेताना नव्याना संधी मिळावी ही त्यांची भूमिका आहे. माझ्या मते हा निर्णय योग्य आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केले. या दोघांचा निर्णय बरोबर आहे मी त्यांचा अभिनंदन करतो असंही पवारांनी म्हटलं.
