Sujata Saunik IAS : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला; पती-पत्नीची अशीही कामगिरी
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Sujata Saunik IAS Maharashtra : सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी काम केलं असून आता त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : महिला दिवसेंदिवस नवीन क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवताना पाहायला मिळत आहेत. अगदी साध्या पदापासून देशाच्या सर्वौच्च पदावर आज महिला विराजमान आहे. या मानाच्या शिरपेचात आता आणखी एक तुरा रोवला गेला आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक (Sujata Saunik IAS) यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे.
सुजाता सौनिक यांनी या आधी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर आता त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. रविवारी संध्याकाळी 5 वाजता मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांच्याकडून त्या सूत्रे हाती घेणार आहेत.
advertisement
पती-पत्नीच्या नावावर असाही विक्रम
सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ अधिकारी असून त्या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. या आधी मनोज सौनिक यांनीही राज्याचे मुख्य सचिवपद भूषवलं आहे. सुजाता सौनिक यांच्या नियुक्तीमुळे आता पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. नितीन करीर यांना तीन महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ देण्यात आला होता. तो कालावधी संपल्यानंतर आता या पदावर सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांचा कालावधी पुन्हा एकदा वाढवून देण्यात येणार असल्याची चर्चा होती. पण राज्य सरकारकडून तसे न करता सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
कोण आहेत सुजाता सौनिक?
view commentsसुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2024 6:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Sujata Saunik IAS : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला; पती-पत्नीची अशीही कामगिरी


