गेल्या 9 महिन्यांत बेपत्ता झाल्याची 844 प्रकरणे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यात 915 जण बेपत्ता झाल्याची नोंद आहेत. 915 पैकी 557 महिला तर 328 पुरुषांचा समावेश समावेश आहे. याशिवाय 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 90 मुली गायब झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात किडनॅपिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. 90 पैकी 55 जणींचा पोलिसांनी यशस्वी शोध घेतला असला तरी 35 अल्पवयीन मुली कुठे आहेत हे अद्याप समजले नाही. ज्या 55 मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आला, त्यापैकी काहींवर किडनॅपिंगनंतर बलात्कार झाल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याशिवाय महिलांवरील अत्याचारांच्या इतरही अनेक घटना 9 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात घडल्या आहेत.
advertisement
वाचा - कारमध्ये जबरदस्तीने बसवलं, दारू पाजली; नंतर.. वर्ध्यात अल्पवयीन मुलीसोबत भयानक घडलं
विनयभंगाची 278 प्रकरणे जिल्ह्यात दाखल झालेली आहेत. महिलांकडे वाईट नजरेने पाहणे, छेडछाड करणे, शरीरसुखाची मागणी करणे, वाईट उद्देशाने स्पर्श करणे अशा बाबी विनयभंग या प्रकारात मोडतात. याशिवाय जिल्ह्यात घरघुती हिंसाचाराची प्रकरणे देखील मोठी आहेत. 9 महिन्यांत अशी 85 प्रकरणे दाखल झाली आहेत.
