Wardha Crime : कारमध्ये जबरदस्तीने बसवलं, दारू पाजली; नंतर.. वर्ध्यात अल्पवयीन मुलीसोबत भयानक घडलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Wardha Crime : जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने दारू पाजून अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
वर्धा, 14 ऑक्टोबर (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या नावाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केला. ही घटना आर्वी तालुक्यातील एका गावात रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
काय आहे प्रकरण?
view commentsपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी 17 वर्षीय मुलीला अशपाक आणि शुभम नामक तरुणांनी कारमध्ये जबरदस्तीने बसवलं. नंतर तिला गावाबाहेरील रस्त्यावर नेत कारमध्येच बळजबरीने दारु पाजली. नंतर दोघांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी माहिती पीडितीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आणि आर्वी पोलिसांचे एक अशी दोन पथके आरोपींच्या मार्गावर आहेत.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 14, 2023 7:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha Crime : कारमध्ये जबरदस्तीने बसवलं, दारू पाजली; नंतर.. वर्ध्यात अल्पवयीन मुलीसोबत भयानक घडलं


