TRENDING:

Crime News : तलवारीने केक कापणे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अंगलट! तिघांवर गुन्हा दाखल

Last Updated:

Crime News : शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा तलवारीनं केक कापतानाचा व्हिडिओ समोर आल्याने टीका होत होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बुलडाणा, (राहुल खंडारे, प्रतिनिधी) : तलवारीने केक कापणे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अंगलट आलं आहे. काही दिवसांपूर्वीच वनविभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे ते चर्चेत आले होते. आता थेट भाईगिरीसारखा तलवारीने केक कापल्याने गुन्हा दाखल केला आहे.
News18
News18
advertisement

संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार संजय गायकवाड यांच्यासह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तलवारीने केक कापून पत्नी आणि मुलाला केक भरवणे आमदार संजय गायकवाड यांना भोवलं आहे. बुलडाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापणे आमदारांना महागात पडले. शिवसेना आमदार गायकवाड यांनी तलवारीने केक कापल्याने टीका होत होती.

advertisement

काय आहे प्रकरण?

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा परवा बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. परवा रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला तसेच कापलेला केक तलवारीनेच आपल्या सुविध्य पत्नी यांना भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो. मात्र, आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या सुविध्य पत्नी पूजा गायकवाड व मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

advertisement

वाचा - विमानतळावर तपासणी; महिलेच्या अंडरगारमेंटमधून निघालं असं काही की सगळे शॉक

संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

या संपूर्ण प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य करत आपल्या कृतीचं स्पष्टीकरण दिलं. "तलवारीनं केक कापणं हा गुन्हा होऊ शकत नाही. तलवारीनं केक कापण्याचा हेतू कोणाचंही नुकसान करण्याचा नाही. यावर गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं" आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं आहे. "नेत्यांना तलवारी देणं हे शौर्याचं प्रतीक मानलं जातं. पोलीस परेडच्या वेळीही पोलीस तलवार दाखवतात, मग ते लोकांना धमकावता का? ऑलिम्पिकमधील तलवारबाजीचा खेळही बंद होणार का? आमच्या पूर्वजांपासून आम्ही तलवार चालवतो, म्हणून आम्ही तलवारीचा वापर करू. गैरवापरामुळं गुन्हा घडू शकतो", असं सांगून, आमदार संजय गायकवाड यांनीही अशा प्रकारे तलवार दाखवणं हा गुन्हा नसल्याचा अजब दावा केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
Crime News : तलवारीने केक कापणे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अंगलट! तिघांवर गुन्हा दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल