ओव्हरकॉन्फिडन्स पडला महागात; तपासणीत महिलेच्या अंडरगारमेंटमधून निघालं असं काही की सगळे शॉक
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एक्झिट गेटजवळ प्रवाशांना चेकिंगसाठी थांबवणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांकडे तिने काही क्षण अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहिलं आणि मग तिच्या सामानाची वाट पाहू लागली.
नवी दिल्ली : दुबईहून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-916 चे प्रवासी टर्मिनल 3 च्या बॅगेज रिक्लेम भागात पोहोचले होते. सर्व प्रवाशांचं लक्ष बॅगेज बेल्टवर येणा-या आपापल्या बॅगवर होतं. मात्र, एक महिला होती, जिचं लक्ष तिच्या बॅगपेक्षा टर्मिनलच्या एक्झिट गेटवर होतं. एक्झिट गेटजवळ प्रवाशांना चेकिंगसाठी थांबवणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांकडे तिने काही क्षण अतिशय तीक्ष्ण नजरेने पाहिलं आणि मग तिच्या सामानाची वाट पाहू लागली.
काही मिनिटं थांबल्यावर मॅडमची बॅग आली आणि ती अरायव्हल टर्मिनलच्या एक्झिट गेटकडे निघाली. मॅडमला कल्पना नव्हती, पण कस्टम प्रिव्हेंटिव्ह टीमने तिच्यावर लक्ष ठेवलं होतं. प्रोफाइलिंगवरून या महिलेमध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचा अंदाज प्रिव्हेंटिव्ह अधिकाऱ्यांना आला होता. ते ही महिला ग्रीन किंवा रेड चॅनलवरून जाण्याची वाट पाहत होते. कस्टम ऑफिसर्सच्या अपेक्षप्रमाणे तिने टर्मिनलमधून जाण्यासाठी ग्रीन चॅनलच निवडला.
advertisement
या महिलेनं चेहऱ्यावर काहीही हावभाव न आणता आणि स्ट्रेट पोश्चरमध्ये ग्रीन चॅनल पार केला. तिने एक्झिट गेट ओलांडण्याआधीच मागे उभ्या असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांनी एक्झिट गेटवर उभ्या असलेल्या प्रिव्हेंटिव्ह पथकाला इशारा केला. प्रिव्हेंटिव्ह पथकाने या महिलेला थांबवून विचारलं - मॅडम! तुमच्याकडे ड्युटी पे करण्यासारखी काही वस्तू आहे का? ज्या अतिआत्मविश्वासाने महिलेनं नकारार्थी मान हलवली त्यामुळे कस्टम ऑफिसच्या संशयाला पुष्टी मिळाली. यानंतर तपासणी कऱण्यासाठी महिलेला बाजूला नेण्यात आलं.
advertisement
महिलेच्या बॅगची आधी झडती घेतली, पण त्यात काहीच सापडलं नाही. यानंतर महिलेची तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान तिच्या कपड्यातून काहीतरी बाहेर आलं, ज्यामुळे सर्वच चकित झाले. खरंतर महिलेनं तिच्या अंडरगारमेंटमध्ये चार सोन्याच्या बांगड्या लपवल्या होत्या. या बांगड्यांचं वजन सुमारे 810 ग्रॅम असल्याचं आढळून आलं, ज्याची भारतीय बाजारपेठेत किंमत अंदाजे 54.29 लाख रुपये आहे.
advertisement
सीमाशुल्क विभागाच्या अतिरिक्त आयुक्त मयुषा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या विमान AI-916 ने IGI विमानतळावर पोहोचलेल्या या महिला प्रवाशाला सीमा शुल्क कायद्याच्या कलम 104 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 18, 2024 8:29 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ओव्हरकॉन्फिडन्स पडला महागात; तपासणीत महिलेच्या अंडरगारमेंटमधून निघालं असं काही की सगळे शॉक


