सराफा व्यावसायिक कैलास धानुका यांचे मथुरा ज्वेलर्स. रात्री दुकान मालक कैलास हे दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळीच ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला की दुकानाचं शटर उघडं आहे कैलास यांनी दुकानात जाऊन पाहिलं आणि त्यांना धक्काच बसला.
13 लाखांचे दागिने गायब
चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात चोरी केली असल्याचे समोर आलं. दुकानातून चोरट्यांनी 13 लाखांचे दागिने लंपास केले. चोरट्यांची ही चोरी दुकानातील cctv मधे कैद झाली.
advertisement
इथं पाहा व्हिडिओ
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तोंडाला रुमाल बांधलेला हा तरुण दुकानाच्या सर्व कपाटातील ऐवज लुटताना दिसतो आहे. शेवटी तो टेबलवर चढतो आणि cctv कॅमेरा ओढून काढताना दिसतो. पण तोपर्यंत त्याने केलेलं संपूर्ण कृत्य या कॅमेर्यात कैद झालं. व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
चोराचा शोध सुरू
त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. cctv च्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. मात्र या घटनेमुळे सराफा व्यावसायिकमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.