याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील हिवरखेड शिवारात गुरूवारी पहाटे एका वाघाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातला. मेंढपाळांच्या मेंढ्याच्या कळपात घुसून नवजात कोकरे, लहान मोठ्या मेंढ्यासह 65 जनावरांचा जीव त्याने घेतला. या घटनेची माहिती मिळताच तलाठी, ग्रामसेवक आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
40 मेंढ्या वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहे तर 20 पेक्षा अधिक मेंढ्या गंभीर त्या जखमी झाल्या आहेत. हिवरखेड गावात घुसून मेंढ्याच्या कळपात वाघाने हल्ला केल्याने गावकरी देखील दहशतीत आहेत. रात्री दरम्यान हल्ला होत असताना मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने गावकऱ्यांनी मेंढ्यांकडे जाऊन पाहिले असता एक वाघ त्या मेंढ्यांवर हल्ला करत असल्याचा गावकऱ्यांनी पाहिलं असल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पुन्हा एकदा वाघाची दहशत पसरली आहे.
advertisement
वाचा - 4 वर्षांचा मुलगा अपघातात गेला, कुटुंबीयांनी दाखवलं धाडस; 7 जणांना मिळालं आयुष्य
मेंढपाळाचे मोठे नुकसान
वाघाने काही मिनिटांत मेंढयाच्या विविध कळपांमध्ये घुसून मेंढ्यांवर हल्ला केला. यात 35 ते 40 कोकरे आणि 25 लहान मोठ्या मेंढ्या मारल्या. त्यामुळे मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, हल्ला करणारे जनावर हे वाघ की बिबट याबाबत घटनास्थळी मतभिन्नता दिसून आली. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतरच या प्रकरणी उलगडा होण्याची शक्यता आहे.
