14 वर्षांचा मुलगा अपघातात गेला, कुटुंबीयांनी दाखवलं धाडस; 7 जणांना मिळालं नवं आयुष्य

Last Updated:

14 वर्षांचा मुलगा अपघातात गेल्यानंतर कुटुंबीयांनी धाडस दाखवत सर्वांसमोर आदर्श ठेवलाय.

+
News18

News18

पुणे, 7 सप्टेंबर :  एकुलता एक मुलगा अपघाती जाणं हा कोणत्याही कुटुंबीयावर आघात असतो. पिंपरी चिंचवडच्या लोहाडे कुटुंबीयांनी त्यांचा 14 वर्षाचा मुलगा काही दिवसांपूर्वीच गमावला. या डोगंराएवढ्या दु:खाच्या प्रसंगातही त्यांनी सामाजिक भान जपत नवा आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या या कृतीनं सात जणांना नवं आयुष्य मिळालंय.
काय घडली घटना?
पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या दुचाकीच्या अपघातामध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्य झाला. तर अक्षत लोहाडे हा 14 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. अक्षतच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्याचे ब्रेन डेड झाले. त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यामुळे अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
अक्षतचे दोन्ही डोळे, फुफ्फुस ,यकृत ,किडनी ,मूत्रपिंड आणि हृदय असे सात अवयव दान करून गरजूंना दिल्या गेले त्यांचं यशस्वी प्रत्यारोपण देखील झालं. आता ते नवं आयुष्य जगतायत. थोड्याशा दुर्लक्षामुळे आम्ही आमची मुलं गमावली. ती उणीव कधीही भरुन येणार नाही.
advertisement
अक्षतच्या आठवणी जपण्याशिवाय आमच्याकडं काही नाही. पण, आमच्या या निर्णयामुळे सात जणांना नवं आयुष्य मिळालंय. याचं समाधान आहे, अशी भावना अक्षतच्या आईनं व्यक्त केली. या प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये यासाठी पालकांनी मुलांबद्दल सजग राहावं असं आवाहनही त्यांनी केलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
14 वर्षांचा मुलगा अपघातात गेला, कुटुंबीयांनी दाखवलं धाडस; 7 जणांना मिळालं नवं आयुष्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement