काय आहे प्रकरण?
संतोष चांदणे याने भालेगावसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली आबे. तो ही प्रकरणे आपसात मिटवण्यासाठी पैसे उकळतो असा आरोप आहे. त्याने भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्यासोबतही असंच काहीसं केलं. संतोष चांदणे याने दोन्ही महिलांकडे 1 लाख रुपयांची मागणी, तसेच अश्लील शिवीगाळही केल्याचा आरोप आहे.
advertisement
मंगला निकम आणि अनिता काळे यांची संतोष चांदणे याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केलीय. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलांकडे 1 लाखांची मागणी केली. तसेच महिला पैसे देण्यास तयार न झाल्याने त्याने महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांना राग अनावर झाला. यावेळी निकम आणि काळे या महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संतोष चांदणे याची चपलेने धुलाई केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
वाचा - 'त्या' प्रकरणात ससून, पोलीस अन् तुरुंग प्रशासनाची CID चौकशी व्हावी : काँग्रेस
संबंधित प्रकरणी आता प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित व्यक्तीकडून अशाप्रकारे किती जणांना फसवण्यात आलं किंवा त्या व्यक्तीवर तशे फक्त आरोप करण्यात आले आहेत का? याचा खुलासा आता प्रशासनाकडून केला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
