नितीन गडकरी यांनी बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग उभारले आहेत. त्यामुळे जे विषय राज्य सरकारकडे आहे ते विषय घेऊन आमदार, खासदार नितीन गडकरी यांच्याकडे जात आहे. यावर उपस्थित आमदार खासदारांना मिश्किल टोला लगावत नितीन गडकरी यांनी चांगलंच सुनावल आहे. जे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत ते विषय घेऊन माझ्याकडे येऊ नका.. मी तुम्हाला सूट शिवून देऊ शकतो. किमान टाय आणि अंडरपॅन्ट, बनियन तरी तुम्ही राज्य सरकारकडून मिळवा असा टोला नितीन गडकरी यांनी लगावला.
advertisement
महिला बचत गटांना ड्रोन दिले जातील आणि युरिया ड्रोनने फवारा असंही गडकरी म्हणाले. महामार्गाचे काम पूर्ण नसताना उद्घाटन केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. यावरही गडकरींनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलं. ते म्हणाले की, रस्त्याचं काम ९७ टक्के पूर्ण झालं आहे. आता जे ३ टक्के काम अपुरं राहिलं आहे ते पावसामुळे राहिलं आहे. महामार्गामुळे शेगाव आणि लोणारला कनेक्टिव्हीटी मिळेल. शिवाय 5 पट राष्ट्रीय मार्ग वाढवले आहेत. फॉरेस्ट चे क्लिअरन्स झाले नाही. मी खूप प्रयत्न केले मात्र फॉरेस्टचे क्लिअरन्स मिळाले नाही.
