advertisement

इंडियात फक्त 'त्या' उमेदवारांनाच तिकीट मिळणार, सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; इच्छुकांची धाकधूक वाढणार?

Last Updated:

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएविरोधात इंडिया असंच चित्र पहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

News18
News18
बारामती, 18 ऑगस्ट, जितेंद्र जाधव : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएविरोधात इंडिया असंच चित्र पहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपविरोधात देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं आहे. इंडियाची पहिली बैठक ही बिहारच्या पाटणामध्ये झाली होती. त्यानंतर दुसरी बैठक बंगळूरूमध्ये काँग्रेसनं बोलावली आणि आता तिसरी बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणूक आम्ही इंडिया म्हणूनच लढणार आहोत. मात्र जागा वाटपाबाबत अद्याप बोलणं झालेलं नाहीये. इंडियात जेव्हा तिकीट वाटपाचा विषय येईल तेव्हा जो उमेदवार पास होईल त्यालाच तिकीट मिळेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून एकोमंकांच्या जागांवर दावा करणं सुरू आहे. काल काँग्रेसनं राष्ट्रवादीच्या माढा मतदारसंघावर दावा केला होता. तर आज राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या सोलापूर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.
advertisement
सुप्रिया सुळे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला देखील महागाईच्या मुद्द्यावरून जोरदार टोला लगावला आहे.  आम्ही सरकारवर प्रेशर आणले, त्यामुळे आता महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. इतक्या दिवस महागाई कमी करणं का सूचलं नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
इंडियात फक्त 'त्या' उमेदवारांनाच तिकीट मिळणार, सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; इच्छुकांची धाकधूक वाढणार?
Next Article
advertisement
BMC Mayor : मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट, भाजपनं सगळा गेम फिरवला, ठाकरेंना पुन्हा धोबीपछाड
मुंबई महापौरपदाच्या निवडीत ट्विस्ट, भाजपनं सगळा गेम फिरवला, ठाकरेंना पुन्हा धोबी
  • मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे.

  • काठावरचं बहुमत असलेल्या महायुती सरकारनं मोठा डाव टाकला आहे.

  • या डावामुळे ठाकरे गटाच्या रणनीतीवर थेट आघात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

View All
advertisement