TRENDING:

शेतकऱ्याची कमाल! कोबीने केलं मालामाल; फक्त सात गुंठ्यात 40 हजार रुपयांचे उत्पन्न

Last Updated:

मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी सात गुंठ्यात कोबीची लागवड केली आहे. सात गुंठ्यात 5 हजार कोबीची लागवड केली असून 70 दिवसांमध्ये सर्व खर्च वजा करून 50 हजार रुपयांचा उत्पन्न मिळाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी सात गुंठ्यात कोबीची लागवड केली आहे. सात गुंठ्यात 5 हजार कोबीची लागवड केली असून 70 दिवसांमध्ये सर्व खर्च वजा करून 50 हजार रुपयांचा उत्पन्न शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांना मिळाला आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी ज्ञानेश्वर हिपरकर यांनी Local 18 शी बोलताना दिली.
advertisement

मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी सात गुंठ्यामध्ये कोबीची लागवड केली आहे.कोबीची लागवड केल्यापासून त्याची मार्केटमध्ये विक्री होईपर्यंत सात हजार रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर त्या कोबीच्या विक्रीतून सर्व खर्च वजा करून 70 दिवसांमध्ये 50 हजार रुपयांचे उत्पन्न शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांना मिळाला आहे. सध्या बाजारात एका कोबीला दहा रुपये प्रमाणे मागणी आहे. जर याच कोबीची 20 रुपये प्रमाणे मागणी असेल तर 70 दिवसांमध्ये 80 हजाराचे उत्पन्न मिळणार आहे. परंतु सध्या बाजारात कोबीला दहा रुपये पासून मागणी असून पन्नास हजाराचा उत्पन्न शेतकरी ज्ञानेश्वरांना मिळणार आहे. तर ज्ञानेश्वर हिप्परकर हे स्वतः आठवडी बाजारात जाऊन कोबीची विक्री करतात. ज्ञानेश्वर यांच्या शेतामध्ये कोबीची तोडणी सुरू असून आणखीन दहा ते वीस दिवसांमध्ये पंधरा हजार रुपये पर्यंत उत्पन्न मिळणार आहे.

advertisement

ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी पाच फुटाचा बेड तयार करून त्यावर कोबीची लागवड केली आहे. कमी पाण्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये कोबीची लागवड केली आहे. तसेच कोबीवर जास्त कीटकनाशकाची फवारणी करावी लागत नाही, फक्त आळीचा प्रादुर्भाव होणे यासाठी फवारणी घ्यावे लागते. कोबीची लागवड करायची असेल तर एक एकर किंवा दोन एकर न लावता सात गुंठ्यात किंवा दहा गुंठ्यात कोबीची लागवड करावी. अशा पद्धतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना स्वतः आठवडे बाजारात जाऊन विकण्यास सोपं होत. अशा पद्धतीने कोबीची लागवड केल्यास नक्कीच फायदा होईल असा सल्ला प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकऱ्याची कमाल! कोबीने केलं मालामाल; फक्त सात गुंठ्यात 40 हजार रुपयांचे उत्पन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल