TRENDING:

Accident News: वर्ध्यात कार आणि दुचाकीची जबर धडक, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

Last Updated:

अपघातांच्या घटनांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज कुठेना कुठे अपघात झाल्याची माहिती समोर येत असते. अशातच आणखी एक घटना समोर आली असून या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नरेंद्र मते, वर्धा, 30 नोव्हेंबर : अपघातांच्या घटनांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाही. दररोज कुठेना कुठे अपघात झाल्याची माहिती समोर येत असते. अशातच आणखी एक घटना समोर आली असून या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. वर्ध्यातून समोर आलेला हा अपघात नेमका घडला कसा याविषयी जाणून घेऊया.
वर्ध्यात कार आणि दुचाकीची जबर धडक
वर्ध्यात कार आणि दुचाकीची जबर धडक
advertisement

वर्ध्यात कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात दाम्पत्यांनी आपला जीव गमावला. केळझर येथील दाम्पत्य गावी परत जात असताना कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा रूग्णालयात मृत्यू झाला.

मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी पाठवले समन्स

काल 29 नोव्हेंरला दुपारी दीडच्या सुमारास वर्ध्यामध्ये ही घटना घडली. चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्न करत असताना भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली. या धडकेत अवधूत वैरागडे (वय 60वर्ष) व चित्रा वैरागडे (वय 55 वर्ष) दोघांची जीव गेला. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अवधूत यांचा जागीच जीव गेला आणि चित्रा यांनी रुग्णालयात नेण्यानंतर. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दाम्पत्यांत्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident News: वर्ध्यात कार आणि दुचाकीची जबर धडक, अपघातात दाम्पत्याचा मृत्यू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल