दसरा-दिवाळी सणाचे औचित्य साधून मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी विशेष साप्ताहिक ट्रेन जाहीर केली आहे. ही गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत एकूण फेऱ्या करणार आहे. या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीदरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवनंतपुरम नॉर्थ-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 01463 एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ साप्ताहिक विशेष गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 4 वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी पोहचेल.
गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम नॉर्थ-एलटीटी विशेष गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शनिवारी तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून 4 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल.
ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सवंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुर, उडीपी, मंगलोर, कासरगोड, कान्नूर, कालिकट, तिरूर, शोरानूर, त्रिचूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कयंकुलम जंक्शन आणि कोल्लम या स्टेशन्सवर थांबेल.