TRENDING:

उदय सामंतांकडून करेक्ट कार्यक्रम, संजय राऊत तोंडघशी, सांगलीत धक्का, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश!

Last Updated:

Chandrahar Patil: चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शिवसेनेत प्रवेश करतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेच्या राजकारणाला वेग आलेला असताना दुसरीकडे मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्या काही महिन्यांपासून वजाबाकीच येत असल्याचे चित्र आहे. कारण सांगली लोकसभेच्या जागेसाठी, प्रसंगी महाविकास आघाडीचे अस्तित्व पणाला लावून आणि काँग्रेसला शिंगावर घेऊन संजय राऊत ज्यांच्यासाठी भांडले, उद्धव ठाकरेंना उमेदवारी द्यायला तयार केलं, तेच चंद्रहार पाटील शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून शिंदेसेनेत दाखल होणार आहेत.
उदय सामंत आणि संजय राऊत
उदय सामंत आणि संजय राऊत
advertisement

औद्योगिक मंत्री उदय सामंत यांनी सांगलीला जाऊन चंद्रहार पाटील यांची भेट घेतली होती. त्याच काळात चंद्रहार पाटील यांनी कोकणात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये प्रवेशासंदर्भात चर्चा झाली. अखेर सोमवारी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करतील.

चंद्रहार पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठी जबाबदारी मिळणार

advertisement

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी लोकसभा निवडणूक काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. शिवसेनेकडून सांगली मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूकही लढले. परंतु अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. तेव्हापासून चंद्रहार पाटील पक्षात एकटे पडल्याची चर्चा होती. त्याच काळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून चंद्रहार पाटील यांना मोठे आश्वासन मिळाले. एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या जबाबदारीचे संकेत मिळाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी पक्षप्रवेशाची तयारी दर्शवली आहे.

advertisement

संजय राऊत तोंडघशी पडले

चंद्रहार पाटील हे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. संजय राऊत यांनीच चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत आणले. अगदी सगळ्यांचा विरोध असतानाही काँग्रेसला अंगावर घेऊन सांगली लोकसभेची उमेदवारी त्यांनी चंद्रहार पाटील यांना दिली. पण निवडणुकीत पराभूत झाल्याच्या वर्षभरानंतर चंद्रहार पाटील यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करून संजय राऊत यांना तोंडघशी पाडले आहे.

advertisement

कोण आहेत चंद्रहार पाटील?

चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सांगलीचे नेते

संजय राऊत यांच्या अतिशय निकटवर्तीय नेते म्हणून चंद्रहार यांची ओळख

सांगली लोकसभेतून शिवसेनेच्या तिकीटावर लढले, विशाल पाटलांकडून पराभूत

आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, जिल्हा परिषद निवडणूकही त्यांनी लढवली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

राजकारणात यायच्या आधी ते कुस्ती खेळायचे, त्यांच्या नावावर डबल महाराष्ट्र केसरीचा किताब आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उदय सामंतांकडून करेक्ट कार्यक्रम, संजय राऊत तोंडघशी, सांगलीत धक्का, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल