TRENDING:

...तर काँग्रेस आघाडीतून बाहेर पडेल, महापालिकेच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची मोठी भविष्यवाणी

Last Updated:

ज्यावेळी युती होते तेव्हा आपल्याला संधी मिळेल की नाही या चिंतेने त्या त्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी गोंधळून जातात, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मोहन जाधव, प्रतिनिधी, रायगड : मुंबई महापालिका आणि इतरही महत्त्वाच्या महापालिकांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बहुचर्चित युती होण्याची शक्यता आहे. तसे संकेत दोन्ही पक्षांकडून आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळत आहे. असे असताना भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसेल, अशी शक्यता अनेक जण व्यक्त करीत असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र आम्ही शक्तिशाली आहोत, आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
advertisement

महापालिका निवडणुका अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे युती आघाड्यांच्या चर्चांनाही वरिष्ठ स्तरावर वेग आलेला आहे.

...तर काँग्रेस आघाडीतून बाहेर पडेल

कोणीही एकत्र आले तरी त्याचा फरक महायुतीला पडणार नाही. महायुती खूपच शक्तिशाली आहे. तिन्ही पक्षांत उत्तम समन्वय आहे. ज्यावेळी युती होते तेव्हा आपल्याला संधी मिळेल की नाही या चिंतेने त्या त्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी गोंधळून जातात. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे वोट बँक तुटण्याच्या भीतीने काँग्रेस बाहेर पडेल, असा मोठा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

advertisement

अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबईत सर्वसामान्यांना आम्ही घरे दिली, त्यामुळे मुंबईकर आमच्यावर खूश

चंद्रकांत पाटील म्हणाले, "आमची माहिती एवढी निश्चित आहे की कोणीही एकत्र आले तरी त्याचा फरक महायुतीला पडणार नाही. ज्यावेळी युती होते तेव्हा त्या त्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी गोंधळून जातात. ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे काँग्रेस बाहेर पडेल, त्यामुळे आम्ही केलेल्या विकास कामामुळे मुंबईतील जनता पॉझिटिव्ह आहे. मुंबईत महायुतीने खूप कामे केली आहेत. अटल सेतू रोड, कोस्टल रोड करण्याबरोबर मुंबईत सर्वसामान्यांना आम्ही घरे दिली. त्यामुळे मुंबईकर आमच्यावर खूश आहे, नागरिकांचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळेल"

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर काँग्रेस आघाडीतून बाहेर पडेल, महापालिकेच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची मोठी भविष्यवाणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल