जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या 53 वर्षीय डेप्युटी स्टेशन मास्टरने चालत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. पिडीत विद्यार्थिनी बल्लारपूर ते चंद्रपूर महाविद्यालयात ये-जा करतात. विद्यार्थिनी सकाळी बल्लारपूरहून बस स्थानकावर असताना आरोपी मिर्झा बेग याने त्यांना छेडले. सायंकाळी 5 वाजता विद्यार्थिनींनी घरी परतल्यावर कुटुंबियांना घडला प्रकार सांगितला. संबंधित मुलींचे पालक स्थानकावर पोचले. धक्कादायक म्हणजे आरोपी बेग तिथे हजर होता. त्याने पुन्हा मुलींना छेडण्याचा प्रकार केला. संतापलेल्या कुटुंबीयांनी मिळून रेल्वे अधिकरी बेग याला बेदम मारहाण केली आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात नेले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. सध्या पोलीस या प्रकरणी कॅमेऱ्यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. आरोपींविरुद्ध पोस्को, 74 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
चंद्रपूर जिल्ह्यात चिमुकल्या मुलींच्या विनयभंगाच्या आणखी 2 घटना उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पहिली घटना नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील असून घराजवळ खेळणाऱ्या एका 8 वर्षीय चिमुकल्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून महादेव गोरडवार (52) या आरोपीने विनयभंग केला. तर दुसऱ्या एका घटनेत चिमूर तालुक्यातील दाबला हेटी गावात मद्यपी तरुणाने 5 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. पीडित मुलगी शाळेत जात असतांना 25 वर्षीय आरोपीने दारूच्या नशेत चिमुकल्या मुलीचा विनयभंग केला.
जालन्याच्या शेतकऱ्यांनी शोधली भन्नाट आयडिया; आज 30 हजारांचा निव्वळ नफा!
जिल्ह्यातील वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात दोन शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित विद्यार्थिनी बी.ए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी संशयित शिक्षकांची नावे आहेत.
वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठी मारण्याची मागणी केली. मुलीने घाबरून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात बळजबरी करण्यात आली. तरीही त्यांच्या तावडीतून कशीबशी पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर वरोरा पोलिसांनी पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
तो घराकडे चालला होता, 'मृत्यू' पाठीमागून आला, कोल्हापूरमधला VIDEO
घटनेची माहिती आणि गुन्हा दाखल होताच आरोपी दोन्ही शिक्षक फरार झाले आहेत. वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष या घटनेनंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिक्षकांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मनसे, भाजप, बजरंग दल या पक्ष संघटनांनी या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. उद्या 31 ऑगस्ट रोजी वरोरा बंदची हाक देण्यात आली आहे.