दरम्यान, महिला घरी न पोहचल्याने कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. बुधवारी रात्रभर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. गुरुवारी सकाळी वर्धा नदीच्या काठावरील पुलाखाली महिलेचा मृतदेह पडलेला आढळून आला. याशिवाय एक चार वर्षाचा मुलगाही जखमी अवस्थेत तिथे उपस्थित होता. पोलिसांनी महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि जखमी मुलालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
चॉकलेट घेण्यासाठी मुलाला घेऊन बाहेर गेली होती
advertisement
बुधवारी सायंकाळी सात वाजता आदित्य प्लाझा बामणी येथे राहणारी सुषमा पवन काकडे ही महिला आपल्या चार वर्षांच्या मुलासाठी चॉकलेट आणण्याचे सांगून स्कूटरवरून घरून निघाली. सुषमा तीन महिन्यांची गर्भवती होती. बामणीहून राजुरा येथे जात असताना स्कूटरचा तोल गेला. सुषमा आपल्या मुलासह स्कूटरवरून वर्धा नदीवरील पुलावरून 30 फूट खाली पडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या सुषमा यांचा जागीच मृत्यू झाला. अंधारामुळे त्यांच्याकडे कोणाचे लक्षही गेले नाही. सुषमा यांचा मुलगाही गंभीर जखमी झाला होता.
कुटुंबीयांनी पोलिसात गुन्हा दाखल केला
इकडे सुषमा घरी न परतल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी त्यांच्या स्तरावर सुषमाचा शोध सुरू केला. कॉल करताना कनेक्ट होत नव्हते. बल्लारपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी उमेश पाटील यांनी सांगितले की, बुधवार-गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात महिला व बालक बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. सुषमा यांचे पती पवन काकडे हे बँकेत कर्मचारी आहेत. पत्नी सुषमा मुलासाठी चॉकलेट आणून देवीच्या दर्शनासाठी बामणी गावात जाण्यास सांगून घरातून निघून गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. येथे पवनला सुषमाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ईमेलद्वारे कळले जे वर्धा नदीजवळ बामणी राजुरा मार्गावर होते.
वाचा - PHOTO : गुन्ह्याच्या ठिकाणी मिळाला तुटलेला दात; पोलिसांनी शोधून काढला अट्टल चोर
मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने पोलिसांना सुगावा
पहाटे चारच्या सुमारास पोलीस पथकासह कुटुंबीय वर्धा नदीवर पोहोचले. चौकशी केली पण काही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी सखोल शोधमोहीम राबवली. यावेळी पुलाखालून एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिले असता नदीच्या काठावर सुषमा यांचा मृतदेह पडलेला दिसला. आईच्या मृतदेहाशेजारी चार वर्षाचा मुलगा रडत होता. त्यालाही दुखापत झाली होती. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी सुषमाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. उंचीवरून पडल्यामुळे सुषमा यांची मान मोडली आणि हातही फ्रॅक्चर झाल्याचं पीएम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
प्रकरणाचा तपास सुरू आहे : पोलीस
बल्लारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी उमेश पाटील यांनी सांगितले की, सध्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुषमा आपल्या मुलासाठी चॉकलेट घेण्यासाठी घरापासून 5 किमी दूर का गेल्या होत्या, याचाही शोध घेतला जात आहे.