याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत यावर्षी आतापर्यंत एकूण 2612 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अगदी कडक उन्हाळा असलेल्या मे महिन्यात देखील मुंबईत 300 मिमी पाऊस झाला. ऑगस्टमध्ये देखील मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. पुढील अनेक पावसाळेही हे चित्र असंच राहण्याची दाट शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून 13 सप्टेंबरपर्यंत कुलाबा वेधशाळेत 1 हजार 700 आणि सांताक्रूझ वेधशाळेत 2 हजार 625 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
advertisement
Weather Alert: रविवारी मुसळधार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट, मुंबईसह कोकणचं हवामान अपडेट
गेल्या 10 वर्षांत मॉन्सूनचा पॅटर्न बऱ्यापैकी बदलला आहे. 10 वर्षांपूर्वी संपूर्ण ऑगस्ट महिन्यात रिमझिम पाऊस होत असे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये सरासरी 550 मिलिमीटर एवढा पाऊस पडतो. परंतु 17, 18 आणि 19 ऑगस्ट या तीन दिवसांत 501 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 5 वर्षांतील ऑगस्ट महिन्यांत झालेला पाऊस यावर्षी अवघ्या तीन किंवा पाच दिवसांत कोसळला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील पॅटर्न झपाट्याने बदलत आहे. मान्सूनच्या 120 दिवसांपैकी प्रत्येक दिवशी पाऊस कोसळत नाही. आता पावसाचे दिवस कमी राहिले आहेत. तरी मोठ्या किंवा तीव्र पावसाचं प्रमाण वाढलं आहे. आता कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे.
पावसाच्या पॅटर्नमधील बदल सुरूच राहिल्यास भविष्यात पृथ्वीवर मोठं संकट येऊ शकतं. अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना माणसाला करावा लागेल.