मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात आज हैदराबाद गॅझेट मधील नोंदणीनुसार कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपास सूरूवात झाली आहे. यावर आता छगन भुजबळांनी संताप व्यक्त करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. कुणबी प्रमाणपत्र अगोदरच शोधून ठेवली होती का हे तपासावं लागेल? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे. तसेच 2 सप्टेंबरला जीआर निघाला त्या संदर्भात कार्यवाही केली का? ही प्रमाणपत्रे योग्य आहे का नाही हे तपासण्याचा आग्रह आम्ही कालच केला असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
advertisement
चुकीची किंवा फेक दस्तवेज सापडल्यास आम्ही कारवाई करू अशा सगळ्या मंत्र्यांना ती ऑर्डर मिळाल्या आहेत.त्यामुळे योग्य तपासणी करून दिले असतील तर आक्षेप नाही, पण चुकीच्या मार्गाने दिली असतील तर हरकत आहे, असे देखील भूजबळांनी स्पष्ट सांगून टाकले.
कुणबी, मराठा समाजाला माझा विरोध नाही. पण नवीन जीआरप्रमाणे कार्यवाही झाली का हे आम्ही चेक करू. एक शिंदे समिती शोधून काढण्यासाठी केली असेल तर खोट शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली पाहिजे,अशीही मागणी भुजबळ यांनी यावेळी केली.
लातूरमध्ये दोन मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त पालकमंत्री शिवेंद्रसिह यांच्या हस्ते हैदराबाद गॅझेट मध्ये सापडलेल्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ०२ सप्टेंबर २०२५ लागू केलेल्या हैदराबाद गॅझेट लागू केलेल्या शासन निर्णयानुसार ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या अशा दोघांना प्रतिनिधी स्वरूपात कुणबी प्रमाणपत्राचे पालकमंत्र्यांनी वाटप केले. ज्यात लातूर तालुक्यातील कासारखेडा येथील शिंदे चंदनसिंह किशोरकुमार आणि वाडी वाघोली येथील श्रेया राहुल भिसे यांना कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे.यामुळे मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.