उंडणगावात बुधवारी मध्यरात्री बाजीराव धनवई आणि त्यांच्या मुलांच्या घराला चोरट्यांनी टार्गेट करून लाखोंच्या मुद्देमालाची चोरी केली. सुमारे 4 क्विंटल वजनाची तिजोरी रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी खाटेवर टाकून शेतात नेली, आणि तेथेच तिचे कुलूप फोडण्यात आले. तिजोरी फोडल्यानंतर त्यांना रोख रक्कम आणि सहज दिसणारे दागिने हाती लागले. चोरट्यांनी ते ताबडतोब उचलून नेले आणि पसार झाले.
advertisement
भावाबद्दल ते दोनच शब्द ऐकले अन् बहीण कोसळली, एकाच दिवशी..., हृदय पिळवटून टाकणारी घटना
दरम्यान, ही फोडलेली तिजोरी रात्री गायब झाल्यापासून थेट दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शेतातच पडून होती. या घटनेमुळे परिसरात दिवसभर चर्चा रंगल्या. शेतात तिजोरी आढळल्यानंतर पाहिलं असता सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमेसह 4 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे आढळले.
5 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या
तिजोरीतील एका सुरक्षित कप्प्यात ठेवलेल्या 5 तोळ्यांच्या चार सोन्याच्या बांगड्या चोरट्यांच्या नजरेसच पडल्या नाहीत. घरच्यांनी चोरीनंतर तपासणी केली असता या बांगड्या सुरक्षित असल्याचे दिसून आले. त्यामुळे धनवई कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आणि मोठे आर्थिक नुकसान टळले. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






