सध्या शहरांमध्ये अनाधिकृतपणे वाहने उभी करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. यामुळे वाहतुकीमध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. याला चाप बसवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि पोलीस यांच्या कडून कारवाईची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून शहरात सुरू होणार आहे. महानगरपालिका ही सर्व यंत्रणा पोलिसांना उपलब्ध करून देत आहे. यातून दंड देखील आकारण्यात येणार आहे. दंडाच्या रकमेमधून महानगरपालिकेला रॉयल्टी ही भेटणार आहे.
advertisement
पितळेच्या वस्तू वाढवतील घराची शोभा, इथं आहे सर्वात स्वस्त मार्केट
किती असणार दंड?
दुचाकी साठी दंड हा 200 रु असेल आणि महानगरपालिकेची रॉयल्टी 50 रुपये असेल. हातगाड्यांसाठी 300 रुपये दंड असेल आणि 100 रूपये महानगरपालिकेची रॉयल्टी असेल. चार चाकीसाठी हा दंड 2000 रुपये असेल आणि 500 रूपये महानगरपालिकेला रॉयल्टी असेल आणि जर गाड्यांना जामर बसवलं तर दंड हा 500 असेल आणि महानगरपालिकेची रॉयल्टी ही 200 असेल.
आवाजाच्या दुनियेचा दुर्मिळ खजिना, PHOTOS पाहून तुम्हीही कराल कौतुक
नागरिकांनी सहकार्य करावं
सध्या शहरातील रस्ते हे चांगलं करण्याचं काम महानगरपालिका करत आहे. पण काही बेशिस्त वाहनधारक गाडी कुठेही उभी करून जातात. यामुळे वाहतुकीमध्ये मोठा अडथळा येतो. शहरामध्ये ट्राफिक जामचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. याला चाप घालण्यासाठी आम्ही हा नियम काढलेला आहे. यामुळे सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य हे करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी केलंय.