TRENDING:

डिसेंबरमध्ये कोर्ट मॅरेज आणि मार्चमध्ये प्रेमविवाहाचा भयानक The End‎, छ. संभाजीनगर हादरलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: प्रेमविवाहानंतर सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता. ‎मात्र काही दिवसांतच पैशांच्या मागणीचा तगादा सुरू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : अनेक अडचणींचा सामना करत आंतरजातीय प्रेमविवाह केला. पण अवघ्या काही दिवसांतच या प्रेमाचा भयानक शेवट झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 14 मार्च रोजी पहाटे 1 वाजताच्या सुमारास एन-5 सिडको परिसरातील अरुणोदय कॉलनी येथे ही घटना घडली.
डिसेंबरमध्ये कोर्ट मॅरेज आणि मार्चमध्ये प्रेमविवाहाचा भयानक The End<br>‎
डिसेंबरमध्ये कोर्ट मॅरेज आणि मार्चमध्ये प्रेमविवाहाचा भयानक The End<br>‎
advertisement

‎या प्रकरणी पती अशोक अंकुश कदम, सासरे अंकुश सर्जेराव कदम, सासू रुख्मिणीबाई अंकुश कदम आणि चुलत दीर संतोष सहादेव कदम (सर्व रा. सौदाना, ता. पाटोदा, जि. बीड) यांच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हनीट्रॅप अन् ब्लॅकमेलिंग, प्राध्यापक लोंढे हत्या प्रकरणाला नवं वळण, तपासात मोठा खुलासा समोर

advertisement

‎मृत सारिका अशोक कदम (27) यांच्या आई बारकुबाई सोपान पवार (रा. दासखेडा, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला. सारिका या एमजीएम रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होत्या. 2025 मध्ये पुणे येथील आळंदी येथे त्यांचा प्रेमविवाह झाला होता, तर 7 डिसेंबर 2025 रोजी कोर्ट मॅरेजची नोंदणीही करण्यात आली होती.

advertisement

लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता. ‎मात्र काही दिवसांतच पैशांच्या मागणीचा तगादा सुरू झाला. कारचे कर्ज फेडण्यासाठी तसेच नवीन टुरिस्ट वाहन घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता. मुलीचा संसार टिकावा म्हणून तिच्या वडिलांनी प्रथम 50 हजार आणि नंतर 25 हजार रुपये दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

‎पुढे सासरी छळ अधिकच वाढला. पतीने सारिकाचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून तिच्या पगारातील रक्कम काढून आई-वडिलांना दिली. याबाबत जाब विचारल्यावर तिच्यावर मारहाण केली जात होती. तसेच ‘तू खालच्या जातीची आहेस, तुला आमच्या घरात राहण्याचा अधिकार नाही’ अशा शब्दांत वारंवार जातीवाचक अपमान करण्यात येत होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

‎सततचा मानसिक त्रास, आर्थिक मागण्या आणि अपमान यामुळे सारिका तणावाखाली गेल्या होत्या. अखेर 14 मार्च रोजी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर नातेवाईकांनी एमजीएम रुग्णालयात मृतदेहाची ओळख पटवली. घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. ‎या घटनेप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे करीत आहेत. ‎

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
डिसेंबरमध्ये कोर्ट मॅरेज आणि मार्चमध्ये प्रेमविवाहाचा भयानक The End‎, छ. संभाजीनगर हादरलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल